स्मार्टफोन निर्माता कंपनी Poco च्या नव्या F6 सिरीजची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु होती. आता अखेर नवीन स्मार्टफोन POCO F6 5G लाँच करण्याची घोषणा करण्यात आली आहे. हा फोन मिड-बजेट सेगमेंटमध्ये भारतात दाखल होईल, अशी अपेक्षा आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात आगामी POCO F6 5G स्मार्टफोनचे भारतीय लॉन्चिंग डिटेल्स-
हे सुद्धा वाचा: Tecno Camon 30 सिरीज भारतात लवकरच होणार लाँच, मिळतील अनेक Powerful फीचर्स। Tech News
POCO F6 5G हा नवीन स्मार्टफोन 23 मे रोजी लाँच होणार आहे, हे या सीरिजचे सामान्य मॉडेल आहे. तर, सिरीजमधील प्रो मॉडेलला ग्लोबल एंट्री मिळणार आहे. POCO F6 Pro 5G आवृत्ती भारतात येईल की नाही याबद्दल माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. POCO F6 सीरीज डिव्हाइसला 4:30 वाजता ग्लोबल लॉन्च इव्हेंटद्वारे प्रवेश दिला जाईल.
तुम्ही वरील पोस्टमध्ये बघु शकता की, या टीझरमध्ये POCO F6 5G डिव्हाइस गोल्डन कलरमध्ये दाखवण्यात आले आहे. त्याबरोबरच, LED फ्लॅशसह मागील पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50MP कॅमेरा असल्याची पुष्टी केली आहे. याव्यतिरिक्त, फोनच्या उजव्या बाजूला व्हॉल्यूम बटण देखील आहे.
POCO F6 5G फोनमध्ये 6.67-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले मिळू शकतो, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येईल. डिस्प्लेसाठी यामध्ये गोरिल्ला ग्लास व्हिक्टस संरक्षण असणे देखील अपेक्षित आहे. परफॉर्मन्ससाठी, कंपनी यात पॉवरफुल Snapdragon 8S Gen 3 चिपसेट देखील देऊ शकते. फोनमध्ये सेल्फी घेण्यासाठी 20MP लेन्स आणि मागील पॅनलवर OIS सह 50MP IMX882 सेन्सर आणि 8MP अल्ट्रावाइड लेन्स मिळेल. त्याबरोबरच, यात 5,000mAh ची मोठी बॅटरी आणि 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल.