POCO F5 स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि जबरदस्त फीचर्स

POCO F5 स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि जबरदस्त फीचर्स
HIGHLIGHTS

Poco ने भारतात नवीन फोन Poco F5 लाँच केला आहे.

ICICI बँक कार्डने खरेदी केल्यास त्यावर 3,000 रुपयांची झटपट सूट

केवळ 46 मिनिटांत 100% चार्ज होईल.

Poco ने भारतात नवीन फोन Poco F5 लाँच केला आहे. हा स्मार्टफोन इतर उपकरणांपेक्षा Wi Fi सिग्नल अधिक चांगल्या प्रकारे पकडू शकतो, असा दावा करण्यात आला आहे. शिवाय, या फोनची किंमत देखील कमी आहे. हा फोन HDR मोड, डॉल्बी व्हिजन आणि डॉल्बी ऑडिओला सपोर्ट करतो. यासह फोनवर चित्रपट बघणे अगदी सोपे होणार आहे. 

POCO F5 ची किंमत 

Poco F5 च्या 8GB/256GB व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये आहे. दुसरा व्हेरिएंट 12GB/256GB स्टोरेजसह येतो, ज्याची किंमत 33,999 रुपये आहे. तुम्ही ICICI बँक कार्डने खरेदी केल्यास त्यावर 3,000 रुपयांची झटपट सूट मिळेल. हा फोन कार्बन ब्लॅक, इलेक्ट्रिक ब्लू इ. कलर ऑप्शनमध्ये येतो.

फीचर्स आणि स्पेक्स 

Poco F5 स्मार्टफोनमध्ये Snapdragon 7+ Gen 2 चिपसेट देण्यात आला आहे. भारतातील हा पहिला फोन आहे, जो या चिपसेटसह येतो. या चिपसेटबाबत कंपनीचा दावा आहे की, फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी तो उत्तम असेल. हा फोन Android 13 सह येतो आणि नंतर अपडेट करण्यात येईल.

या फोनमध्ये 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 67W फास्ट चार्जिंगसह येते. हा स्मार्टफोन केवळ 46 मिनिटांत 100% चार्ज होऊ शकतो. यामध्ये 64-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2MP मॅक्रो सेन्सरचा समावेश आहे. व्हिडिओ कॉल आणि सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo