Poco चा नवीन फोन Poco F4 5Gची भारतात लॉंचिंग कन्फर्म झाली आहे. Poco F4 5G भारतात 23 जून रोजी लाँच होईल आणि त्याच दिवशी स्मार्टफोनचे ग्लोबल लाँच देखील आहे. Poco F4 5G मध्ये, 256 GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेजसह 12 GB LPDDR5 रॅम उपलब्ध आहे. Poco F4 5G फोन स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसर सह ऑफर केला जाईल. कंपनीने Poco F4 5G चा टीझर देखील जारी केला आहे.
भारताव्यतिरिक्त, Poco F4 5G चे जागतिक लाँच 23 जून रोजी संध्याकाळी 5.30 वाजता होईल. लॉन्चिंग इव्हेंट कंपनीच्या यूट्यूब चॅनलवर थेट पाहता येणार आहे. टीझरनुसार, Poco F4 5Gमध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह 64-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. इतर दोन कॅमेऱ्यांबाबत सध्या कोणतीही माहिती नाही.
हे सुद्धा वाचा : 9000 रुपयांपेक्षा स्वस्त मिळतोय Xiaomi स्मार्टफोन, मिळेल 64MP ट्रिपल कॅमेरा आणि 128GB स्टोरेज
Poco F4 5G ला वॉटर रेसिस्टंटसाठी IP53 रेटिंग मिळेल. याशिवाय फोनमध्ये LiquidCool 2.0 देखील उपलब्ध असेल. हा फोन तीन कलर व्हेरियंटमध्ये लॉन्च केला जाईल. Poco चा हा फोन Redmi K40S चे री-ब्रँडेड वर्जन असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय, या Poco फोनमध्ये तीन रियर कॅमेरे आणि 120Hz AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. Redmi K40S मध्ये 6.67-इंच लांबीचा फुल HD + डिस्प्ले आहे, ज्याचा पॅनल Samsung E4 Amoled आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे.
फोनमध्ये तीन रियर कॅमेरे आहेत. ज्यामध्ये प्रायमरी लेन्स 48 मेगापिक्सेल आहे, जो Sony IMX582 सेन्सर आहे, तथापि पोकोच्या फोनमध्ये 64 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा उपलब्ध असेल. फोनमध्ये 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4500mAhची बॅटरी आहे. त्याबरोबरच, फोनमध्ये 20-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आणि IR ब्लास्टर देखील आहे.