Poco F4 5G भारतात आज म्हणजेच 23 जून रोजी लाँच होणार आहे. Poco F4 5G चे लाँचिंग आज संध्याकाळी 5.30 वाजता होईल. भारताव्यतिरिक्त, Poco F4 5G आज जागतिक स्तरावर देखील लाँच होणार आहे. लॉन्चिंग इव्हेंट कंपनीच्या YouTube चॅनलवर थेट पाहता येईल. टीझरनुसार, Poco F4 5Gमध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह 64-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळेल. इतर दोन कॅमेऱ्यांबाबत सध्या कोणतीही माहिती नाही.
हे सुद्धा वाचा : Jaadugar Trailer: जितेंद्र-आरुषी दाखवणार 'प्रेमाची जादू', चित्रपट लवकरच Netflix वर होणार रिलीज
Poco F4 5G सह, कंपनीने दोन वर्षांपर्यंतची वॉरंटी जाहीर केली आहे. Poco F4 5G ला वॉटर रेसिस्टंटसाठी IP53 रेटिंग मिळेल. याशिवाय फोनमध्ये LiquidCool 2.0 देखील उपलब्ध असेल. हा फोन तीन कलर व्हेरियंटमध्ये लॉन्च केला जाईल. Poco चा हा फोन Redmi K40S चे री-ब्रँडेड वर्जन असल्याचे बोलले जात आहे.
याव्यतिरिक्त, या Poco फोनमध्ये तीन रियर कॅमेरे आणि 120Hz AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. शिवाय, Redmi K40S मध्ये 6.67-इंच लांबीचा फुल HD + डिस्प्ले आहे, ज्याचा पॅनल Samsung E4 Amoled आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे.
फोनमध्ये तीन रियर कॅमेरे आहेत, ज्यात प्रायमरी लेन्स 48 मेगापिक्सेल आहे, जो Sony IMX582 सेन्सर आहे. तसेच, पोकोच्या फोनमध्ये 64 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा उपलब्ध असेल. फोनमध्ये 4500mAh ची बॅटरी आहे, ज्याबरोबरच 67W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट करेल. फोनमध्ये 20-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे आणि IR ब्लास्टर देखील आहे.