5,000 रुपयांच्या डिस्काउंट सह उपलब्द होईल Poco F1

5,000 रुपयांच्या डिस्काउंट सह उपलब्द होईल Poco F1
HIGHLIGHTS

जर तुम्ही पण Poco F1 स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबरी आहे. कारण कंपनीने युजर्स साठी एक डिस्काउंट ऑफर आणली आहे जी 6 डिसेंबर पासून सुरु होईल. तसे पाहता या फोनच्या बेस मॉडेलची किंमत 20,999 रुपये आहे.

Poco F1 स्मार्टफोन साठी कंपनी ने 8 डिसेंबर पर्यंत डिस्काउंट ऑफर आणली आहे. हि डिस्काउंट ऑफर 6 डिसेंबर पासून युजर्स साठी सुरु केली जाईल. याचा खुलासा कंपनी ने सोशल मीडिया साईट ट्विटर वरून केला आहे. युजर्सना या स्मार्टफोनच्या खरेदीवर 5,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट दिला जात आहे. या डिस्काउंटचा फायदा घेण्यासाठी युजर्स Mi.com आणि Flipkart वर एक्सक्लूसिवलो जाऊन हा विकत घेऊ शकता. Poco F1 मध्ये युजर्सना MIUI 10 Global Beta ROM 8.11.15 बिल्डच्या माध्यमातून Android 9.0 Pie मिळत आहे. 

शाओमीचा हा स्मार्टफोन ऑगस्ट मध्ये चीन मध्ये Qualcomm Snapdragon 845 SoC प्रोसेसर सह लॉन्च करण्यात आला होता. याच्या बेस मॉडेलची किंमत 20,999 रुपये आहे. स्टोरेज साठी युजर्सना या स्मार्टफोनचे तीन वेरीएंट्स मिळतात. यात 64 जीबी, 128 जीबी आणि 256 जीबी वेरीएंटचा समावेश आहे. रॅम मध्ये तुम्हाला 6 जीबी आणि 8 जीबी रॅम चे ऑप्शन मिळतात. चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनीने पोको एफ1 चा आर्मर्ड एडिशन मॉडेल पण लॉन्च केला होता ज्याची किंमत 29,999 रुपये आहे.

Poco India ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून याची घोषणा केली आहे. कंपनी ने डिस्काउंट बद्दल जास्त माहिती दिली नाही. पण अशा आहे की Poco F1 डिस्काउंट सह फ्लॅश सेल मध्ये उपलब्द होईल. विशेष म्हणजे की 6 आणि 8 डिसेंबर दरम्यान Flipkart चा 'बिग बिलियन डेज' सेल पण आयोजित होणार आहे.

जर याची किंमत भारतीय मार्केट मध्ये बघितली तर शाओमी Poco F1 च्या 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज वेरीएंट ची किंमत 20,999 रुपये आहे. तर याच्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरीएंट ची किंमत 23,999 रुपये आहे. फोनचा 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज वेरीएंट 28,999 रुपयांमध्ये उपलब्द आहे. स्मार्टफोन मध्ये पॉलीकार्बोनेट बॅक आहे. रंगाबद्दल बोलायचे झाले तर हा डिवाइस रोसो रेड, स्टील ब्लू आणि ग्राफाइट ब्लॅक रंगांत उपलब्द आहे.

Xiaomi Poco F1 चे स्पेसिफिकेशन्स

Xiaomi Poco F1 ड्यूल सिम सह आउट ऑफ बॉक्स एंड्रॉयड 8.1 ओरियो वर आधारित मीयूआई 9.6 सह येतो. Poco F1 मध्ये 6.18 इंचाचा डिस्प्ले आहे जो 2.5डी कर्व्ड गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन सह येतो. Xiaomi ने माहिती दिली आहे की ते Poco F1 साठी मीयूआई चा कस्टमाइज्ड वर्जन वापरात आहे. इंटरफेस मध्ये थोडे बदल करण्यात आले आहेत. पोको लॉन्चर स्टॉक एंड्रॉयड यूआई सारखा वाटतो. थर्ड पार्टी ऍप आइकन साठी पण सपोर्ट देण्यात आला आहे. या चीनी डिवाइस मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 845 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे जो 'लिक्विड कूल टेक्नोलॉजी' सह येतो.

कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचे झाले तर Xiaomi Poco F1 च्या बॅकला दोन कॅमेरे आहेत. प्राइमरी सेंसर 12 मेगापिक्सलचा आहे जो सोनी आईएमएक्स363 सेंसर आहे. याच सेंसरचा वापर शाओमीच्या Mi 8 आणि Mi Mix 2s सारख्या फ्लॅगशिप फोन मध्ये करण्यात आला आहे. दुसरा 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे. फ्रंट कॅमेरा 20 मेगापिक्सलचा आहे जो एचडीआर आणि एआई ब्यूटी फीचर सह येतो. फोन मध्ये इंफ्रारेड लाइट आहे जी फेस अनलॉक फीचर साठी उपयोगी पडते. Xiaomi नुसार AI कॅमेरा भारतासाठी ट्यून करण्यात आला आहे आणि यात सीन रिकग्निशन फीचर पण आहे.

कनेक्टिविटी फीचर मध्ये 4जी+, वीओेएलटीई, वाई-फाई 802.11एसी, ब्लूटूथ 5.0, यूएसबी टाइप-सी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅकचा समावेश करण्यात आला आहे. एक्सेलेरोमीटर, एंबियंट लाइट सेंसर, डिजिटल कंपास, जायरोस्कोप आणि प्रॉक्सिमिटी सेंसर या फोनचा भाग आहेत. सोबतच फोन मध्ये 4000 एमएएच ची बॅटरी आहे जी क्विक चार्ज 3 ला सपोर्ट करते.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo