Xiaomi च्या सब-ब्रँड Poco F1 स्मार्टफोनला MIUI 10.2.2.0 ग्लोबल स्टेबल अपडेट मिळायला सुरवात झाली आहे. विशेष म्हणजे चीनी मोबाईल निर्माता कंपनीचा हा अपडेट स्लो-मो मोड 960 फ्रेम प्रति सेकेंड सह येत आहे. सोबतच लो-लाइट मोड पण सुधारण्यात आला आहे. Poco F1 ला मिळणाऱ्या या अपडेटचा बिल्ड नंबर V10.2.2.0.PEJMIXM आहे आणि अपडेट फाइलची साइज 311MB आहे. विशेष म्हणजे हा अपडेट रोल-आउट झाल्याची माहिती यूजर रिपोर्ट्सच्या माध्यमातून समजली आहे. Poco India के General Manager C Manmohan ने गेल्याच आठवड्यात या नवीन अपडेट बद्दल सांगितले होते.
विशेष म्हणजे शाओमी ने Poco F1 स्मार्टफोन साठी Android Pie वर आधारित MIUI 10 Global Stable ROM अपडेट आणला होता त्यानंतर आता हा नवीन अपडेट आला आहे. काही यूजर्सनी MIUI फोरम वर Poco F1 च्या MIUI 10.2.2.0 ग्लोबल स्टेबल अपडेट ची बातमी पोस्ट केली आहे. मीयूआई 10 च्या या लेटेस्ट अपडेट नंतर आता Poco F1 960 फ्रेम प्रति सेकेंडच्या स्पीडने वीडियो रिकॉर्डिंग करू शकेल. लो-लाइट मोड मुळे अंधारात पण चांगले फोटो यूजर्सना मिळतील.
Poco चे ग्लोबल हेड Alvin Tse ने ट्वीट करून स्पष्ट केले आहे कि MIUI 10.2.2.0 अपडेट अनेक बग फिक्स सह येत आहे. ट्वीट नुसार पुढील काही दिवसांत सर्व Poco F1 यूजर्स पर्यंत हा अपडेट पोहचेल. ट्वीट मध्ये अपडेट लेटेस्ट एंड्रॉयड सिक्योरिटी पॅच सह येत आहे असा उल्लेख करण्यात आला आहे.
यूजर्स नुसार अपडेट डिसेंबर 2018 एंड्रॉयड सिक्योरिटी पॅच सह दिला जात आहे.
https://twitter.com/atytse/status/1086027985243828224?ref_src=twsrc%5Etfw
Xiaomi Poco F1 आउट ऑफ बॉक्स एंड्रॉयड 8.1 ओरियो वर आधारित मीयूआई 9.6 सह लाँच झाला होता पण आता याला एंड्रॉयड 9.0 पाई वर आधारित MIUI 10 चा अपडेट मिळाला आहे. तसेच यात ड्यूल सिम सपोर्ट पण आहे. Poco F1 मध्ये 6.18 इंचाचा डिस्प्ले आहे जो 2.5डी कर्व्ड गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन सह येतो. फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 845 प्रोसेसरचा वापर झाला आहे जो लिक्विडकूल टेक्नोलॉजी सह येतो.
यात 6 जीबी आणि 8 जीबी रॅम देण्यात आला आहे. ऑप्टिक्स बद्दल बोलायचे तर Xiaomi Poco F1 च्या मागच्या बाजूला दोन कॅमेरे आहेत. प्राइमरी सेंसर 12 मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स 363 सेंसर आहे. दुसरा 5 मेगापिक्सलचा सॅमसंगचा डेप्थ सेंसर आहे. फ्रंट कॅमेरा 20 मेगापिक्सलचा आहे जो एचडीआर आणि एआई ब्यूटी फीचर ने सुसज्ज आहे. फोन मध्ये इंफ्रारेड लाइट आहे जी फेस अनलॉक फीचर साठी आहे.
Poco F1 मध्ये आपको 64 जीबी, 128 जीबी आणि 256 जीबी इन- बिल्ट स्टोरेज मिळते. कनेक्टिविटी फीचर मध्ये 4जी+, वीओेएलटीई, वाई-फाई 802.11एसी, ब्लूटूथ 5.0, यूएसबी टाइप-सी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक चा समावेश आहे. तसेच फोन मध्ये 4000 एमएएच ची बॅटरी आहे जी क्विक चार्ज 3 ला सपोर्ट करते.