Xiaomi ने आज भारतात आपला नवीन सब-ब्रांड लॉन्च केला आहे, या ब्रँड अंतर्गत कंपनी ने आपला पहिला स्मार्टफोन POCO F1 लॉन्च केला आहे. पण एक नवीन ब्रँड असूनही हा Xiaomi परिवाराचाच एक भाग असेल.
Xiaomi POCO F1 ची किंमत आणि लॉन्च ऑफर्स
Xiaomi POCO F1 स्मार्टफोन Rs 20,999 च्या बेसिक किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे आणि यात काही रॅम आणि स्टोरेज वेरिएंट आहेत. या डिवाइस मध्ये अधिकतम रॅम 8GB पर्यंत आहे आणि स्टोरेज बद्दल बोलायचे तर ती 256GB पर्यंत जाते. कंपनी ने डिवाइसचा बेस वेरिएंट Rs 20,999 मध्ये लॉन्च केला आहे, तसेच याचा मिड-रेंज वेरिएंट कंपनी ने Rs 23,999 मध्ये लॉन्च केला आहे, त्याचबरोबर याचा टॉप-एंड वेरिएंट कंपनी ने Rs 28,999 मध्ये लॉन्च केला आहे. तसेच कंपनी ने एक स्पेशल अर्मोरेड एडिशन ची पण घोषणा केली आहे, जो Kevlar बॅक पॅनल सोबत येतो. हा डिवाइस 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज सह सादर करण्यात आला आहे, या वेरिएंट ची किंमत Rs 29,999 आहे.
फोन 29 ऑगस्ट पासून फ्लिपकार्ट आणि मी.कॉम वरून विकत घेता येईल. तसेच हा डिवाइस विकत घेणारे लोकांनी HDFC चे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरल्यास Rs 1,000 चा डिस्काउंट पहिल्या सेल मध्ये मिळणार आहे. हा डिस्काउंट तुम्हाला फोन च्या सर्व मॉडेल्स वर मिळेल. त्याचबरोबर तुम्हाला रिलायंस जियो कडून जवळपास Rs 8,000 चे फायदे मिळत आहेत, तसेच तुम्हाला जवळपास 6TB पर्यंतचा फ्री डेटा देण्यात येत आहे. फोन मध्ये तुम्हाला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर मिळत आहे, तसेच यात 6GB चा किंवा 8GB चा रॅम पण आहे. याची स्टोरेज पाहता यात तुम्हाला 64GB आणि 256GB पर्यंतची स्टोरेज मिळत आहे.
Xiaomi POCO F1 स्मार्टफोन चे स्पेसिफिकेशन
या डिवाइस मधील हाई-एंड चिपसेट व्यतिरिक्त इतर स्पेक्स बद्दल बोलायचे तर यात तुम्हाला एक 12-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सलचा ड्यूल कॅमेरा सेटअप मिळत आहे. या कॅमेरा मध्ये AI क्षमता आहे. सोबतच फोन मध्ये एक 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पण मिळत आहे. फोन मध्ये एक 4,000mAh क्षमता असलेली बॅटरी आहे. जी क्वालकॉम च्या क्विक चार्ज 3.0 ला सपोर्ट करते.
फोन मध्ये 6.18-इंचाची एक FHD+ 18.7:9 आस्पेक्ट रेश्यो वाली स्क्रीन मिळत आहे, तसेच यात एक नॉच पण देण्यात आली आहे. फोन मध्ये तुम्हाला एक हाइब्रिड ड्यूल सिम स्लॉट पण मिळेल. तसेच यात डिवाइस ड्यूल-VoLTE सपोर्ट पण आहे.