बहुप्रतीक्षित Poco C71 फोन भारतात अखेर लाँच! किंमत 7000 रुपयांपेक्षा कमी, फीचर्सही जबरदस्त

POCO ने भारतात नवीन C-सिरीज स्मार्टफोन POCO C71 लाँच केला आहे.
POCO C71 स्मार्टफोनची किंमत 6,499 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 7 वेगवेगळ्या रंगांचे फिल्टर आणि नाईट मोड आहे.
POCO ने भारतात नवीन C-सिरीज स्मार्टफोन POCO C71 लाँच केला आहे. या फोनची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होती, आता अखेर स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. लक्षात घ्या की, या स्मार्टफोनची किंमत बजेट रेंजमध्ये ठेवण्यात आली आहे. हे भारतीय बाजारात Vivo आणि Realme सारख्या ब्रँडच्या मोबाईल फोनशी जबरदस्त स्पर्धा करेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Poco C71 फोनची भारतीय किंमत आणि फीचर्स-
Poco C71 ची किंमत आणि उपलब्धता
POCO C71 स्मार्टफोनची किंमत 6,499 रुपये निश्चित करण्यात आली आहे. या किमतीत 4GB+ 64GB स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध असेल. तर, त्याचा 6GB+ 128GB स्टोरेज व्हेरिएंट 7,499 रुपयांना उपलब्ध आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री 8 एप्रिलपासून Flipkart वर सुरू होणार आहे. हा फोन पॉवर ब्लॅक, कूल ब्लू आणि डेझर्ट गोल्ड रंगांमध्ये उपलब्ध आहे.
Poco C71 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Poco C71 मध्ये प्रीमियम स्प्लिट ग्रिड डिझाइन देण्यात आले आहे. या फोनमध्ये 6.88 इंच लांबीचा मोठा डिस्प्ले मिळेल, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. तिला TUV RHEINLAND TRIPLE प्रमाणपत्र मिळाले आहे. या बजेटमध्ये तुम्हाला वेट टचची सुविधा देखील मिळणार दिली आहे. म्हणजेच यासह वापरकर्ते ओल्या हातांनीही डिव्हाइस वापरण्यास सक्षम असतील. डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर देण्यात आले आहे.
अद्भुत फोटो काढण्यासाठी, या फोनमध्ये 32MP चा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 7 वेगवेगळ्या रंगांचे फिल्टर आणि नाईट मोड आहे. त्याबरोबरच, आकर्षक सेल्फी क्लिक करण्यासाठी हँडसेटच्या पुढील बाजूस 8MP फ्रंट कॅमेरा मिळेल. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 5200mAh बॅटरी दिली आहे, ही बॅटरी 15W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. . चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी, मोबाईल फोनमध्ये ड्युअल सिम, Wi-Fi, GPS, ब्लूटूथ, ऑडिओ जॅक आणि USB टाइप-C पोर्ट सारखी फीचर्स देण्यात आली आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile