Poco ने बजेट रेंजमध्ये आपला नवीन फोन Poco C65 लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये परवडणाऱ्या किमतीत अनेक अनेक अप्रतिम फीचर्स मिळणार आहेत. होय, MediaTek Helio G85 चिपसेट सह नवीन बजेट स्मार्टफोन Poco C65 लाँच केला आहे. हा फोन Poco C55 चा सक्सेसर असल्याचे बोलले जात आहे. ज्याला अनेक अपग्रेडसह सादर करण्यात आले आहे. चला तर मग जाणून घेऊयात स्मार्टफोनच्या इतर सर्व फीचर्सबद्दल-
हे सुद्धा वाचा: BSNL Diwali Offer: ‘या’ तीन लोकप्रिय प्लॅनसह कंपनी देतेय Extra 3GB डेटा Free, मिळतील अनेक आकर्षक बेनिफिट्स
वर सांगितल्याप्रमाणे, Poco C65 ची किंमत अजूनही पडद्याआड ठेवण्यात आली आहे. पण, हा फोन ब्लॅक, ब्लू अशा अनेक कलर व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे.
Poco C65 फोन 6.74 इंच लांबीच्या डिस्प्लेसह येतो, ज्यामध्ये 90Hz रीफ्रेश रेट आणि 600 nits ची पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे. डिस्प्लेमध्ये वॉटरड्रॉप नॉच डिझाइन आहे. तसेच, सुरक्षिततेसाठी कंपनीने फोनच्या डिस्प्लेला गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन दिले आहे.
हे MediaTek Helio G85 चिपसेटसह 8 GB रॅम आणि 256 GB पर्यंत स्टोरेजसह सुसज्ज आहे. Helio G85 च्या मदतीने कॅमेऱ्याला Google Lens आणि AI चा सपोर्ट मिळेल. एवढेच नाही तर सीन डिटेक्शन आणि बॅकग्राउंड रिमूव्हलची सुविधाही उपलब्ध होणार आहे.
जर आपण कॅमेरा विभागाकडे पाहिले तर, डिव्हाइसमध्ये मागील बाजूस 50MP चा मुख्य कॅमेरा आहे. आणखी 2 सेन्सर देखील आहेत. फोनमध्ये सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.
फोनला पॉवर देण्यासाठी Poco च्या या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आहे, ज्यासोबत कंपनी 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट देत आहे.
फोनमध्ये उपलब्ध इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोन फिंगरप्रिंट स्कॅनरसह येतो, जो पॉवर बटणमध्ये उपस्थित आहे. फोन MIUI 14 वर चालते. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये USB-C पोर्ट, 3.5mm हेडफोन जॅक, WiFi, NFC आणि ब्लूटूथ देखील समाविष्ट आहेत.