चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Poco ने भारतात बजेट श्रेणीमध्ये आपला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. या नव्या बजेट हँडसेटचे नाव Poco C65 असे आहे. लक्षात घ्या की, हा स्मार्टफोन 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत भारतीय बाजारात सादर करण्यात आला आहे. एवढेच नाही तर, आकर्षक किमतीत हे उपकरण खरेदी करण्यासाठी ग्राहक लाँच ऑफरचा लाभ देखील घेऊ शकतात.
हे सुद्धा वाचा: Vivo X100 सिरीज ग्लोबल मार्केटमध्ये लाँच, लोकप्रिय iPhone 15 ला देणार जबरदस्त स्पर्धा? Tech News
Poco C65 हा स्मार्टफोन तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. फोनच्या बेस 4GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 8,499 रुपये इतकी आहे. तर, 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 9,499 रुपये आणि 8GB + 256GB टॉप व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे 10,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.
हा हँडसेट ब्लू, ब्लॅक आणि पर्पल या तीन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध असेल. उप्लब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, Poco C65 चा पहिली सेल 18 डिसेंबरपासून Flipkart वर दुपारी 12 वाजता सुरू होईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, लाँच ऑफरचा भाग म्हणून ग्राहक ICICI बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे 1000 रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळवू शकतात.
Poco चा हा हँडसेट 6.74-इंच लांबीच्या HD+IPS स्क्रीनसह येतो, जो 90Hz रिफ्रेश रेट देतो. परफॉर्मन्ससाठी या 4G डिव्हाइसमध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसर उपलब्ध आहे. तर, हे डिवाइस Android 13-आधारित MIUI 14 वर चालते. सुरक्षिततेसाठी, यात साइड-माउंट केलेले फिंगरप्रिंट रीडर आहे.
ऑप्टिक्ससाठी, Poco च्या या नवीन स्मार्टफोनमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा आणि 2MP मॅक्रो लेन्स आहे. फोनच्या समोर 8MP सेल्फी शूटर समाविष्ट आहे. यात 5000mAh बॅटरी आहे जी 18W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. याशिवाय, कनेक्टिव्हिटीसाठी हे डिव्हाइस चार्जिंग आणि डेटा ट्रान्सफरसाठी Wi-Fi, ब्लूटूथ 5.3, हेडफोन जॅक आणि USB टाइप-C पोर्ट देते.