digit zero1 awards

Poco C65 स्वस्त स्मार्टफोन ‘या’ दिवशी भारतात होणार लाँच, कमी किमतीत मिळेल 50MP कॅमेरा। Tech News 

Poco C65 स्वस्त स्मार्टफोन ‘या’ दिवशी भारतात होणार लाँच, कमी किमतीत मिळेल 50MP कॅमेरा। Tech News 
HIGHLIGHTS

POCO C65 स्मार्टफोन भारतात 15 डिसेंबर रोजी लॉन्च होणार

Poco India ने आपल्या X म्हणजेच आपल्या ट्विटर अकाउंटवरून याबाबत माहिती दिली

यात 50MP मुख्य कॅमेरा आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा मिळेल.

POCO C65 स्मार्टफोन गेल्या महिन्यातच जागतिक बाजारात लाँच करण्यात आला होता. त्यानंतर हा स्वस्त स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात देखील लाँच केला जाऊ शकतो. POCO C65 स्मार्टफोन भारतात 15 डिसेंबर रोजी लॉन्च होणार आहे, अशा चर्चा सुरु आहेत. कारण, Poco India ने आपल्या X म्हणजेच आपल्या ट्विटर अकाउंटवरून याबाबत माहिती दिली आहे.

हे सुद्धा वाचा: नव्या रंगरूपात लाँच झाले Motorola चे दोन जबरदस्त स्मार्टफोन्स, फ्लिप फोनचा New लुक आवडेल तुम्हाला। Tech News

वरील टीझर इमेजवरून असे समजते की, जागतिक मॉडेल डिझाइन भारतात देखील लाँच होणार आहे. तसेच, भारतात या फोनचे स्पेक्स जागतिक मॉडेलसारखेच असू शकतात. POCO C65 स्मार्टफोन ब्लॅक, ब्लू आणि पर्पल कलर पर्यायांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. मात्र, याबाबत अद्याप अधिकृतपणे काहीही समोर आलेले नाही.

Poco C65 स्पेसिफिकेशन्स (जागतिक व्हेरिएंट)

फोनच्या जागतिक व्हेरिएंटबद्दल बोलायचे झाल्यास, POCO C65 स्मार्टफोन 6.74 इंच लांबीच्या डॉट ड्रॉप डिस्प्लेसह लाँच करण्यात आला होता, जो 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. फोनमध्ये गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन देखील देण्यात आले आहे. स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसर आहे. फोनमध्ये AI फेस अनलॉक फीचर देखील उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन MIUI 14 वर सादर करण्यात आला होता.

Poco C65 Launch
Poco C65

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा आहे, यात 50MP मुख्य कॅमेरा आहे, याशिवाय फोनमध्ये 2MP मॅक्रो लेन्स देखील आहे. फोनमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे. या फोनमध्ये 18W चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी आहे. फोनमध्ये उपलब्ध इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये USB टाइप C पोर्ट आणि 3.5 मिमी ऑडिओ जॅक आहे. फोनमध्ये साइड फेसिंग फिंगरप्रिंट सेन्सर देखील असणार आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo