digit zero1 awards

त्वरा करा! पहिल्या सेलमध्ये Poco C65 फक्त 10,000 रुपयांमध्ये मिळवा, 50MP कॅमेरासह Limited स्टॉक उपलब्ध। Tech News 

त्वरा करा! पहिल्या सेलमध्ये Poco C65 फक्त 10,000 रुपयांमध्ये मिळवा, 50MP कॅमेरासह Limited स्टॉक उपलब्ध। Tech News 
HIGHLIGHTS

Poco C65 स्मार्टफोन आज भारतीय बाजारात खरेदीसाठी उपलब्ध होणार

ICICI बँक क्रेडिट/डेबिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर 1000 रुपयांची त्वरित सूट

या फोनमध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी Helio G85 प्रोसेसर मिळेल.

नुकतेच लाँच झालेला Poco C65 स्मार्टफोन आज भारतीय बाजारात खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. C -सीरीजचा हा नवीनतम स्मार्टफोन गेल्या आठवड्यात देशात लाँच करण्यात आला होता. हा बजेट स्मार्टफोन हे MediaTek Helio चिपसेट आणि 8GB रॅमने सुसज्ज आहे. पहिल्या सेलमध्ये हा स्मार्टफोन ऑफर्ससह आणला जात आहे. या ऑफर्ससह हा स्मार्टफोन अगदी स्वस्तात उपलब्ध करून देण्यात येईल. चला तर मग, या स्मार्टफोनची भारतीय किंमत, लॉन्च ऑफर, स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि उपलब्धतेबद्दल सविस्तर माहिती बघुयात-

Poco C65 सेल डिटेल्स

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर आज दुपारी 12 वाजता या फोनची सेल सुरू होईल. हा स्मार्टफोन 4GB + 128GB, 6GB + 128GB आणि 8GB + 256GB अशा तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, डिव्हाइसच्या 4GB रॅम मॉडेलची किंमत 8,499 रुपये आहे, तर 6GB आणि 8GB वेरिएंटची किंमत अनुक्रमे 9,499 रुपये आणि 10,999 रुपये आहे.

पहिल्या सेलमधील उपलब्ध ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ग्राहकांना ICICI बँक क्रेडिट/डेबिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर 1000 रुपयांची त्वरित सूट मिळेल. हा हँडसेट मॅट ब्लॅक आणि पेस्टल ब्लू कलर ऑप्शनमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. येथून खरेदी करा

Poco C65 चे स्पेसिफिकेशन्स

POCO C65 FEATURES AND SPECS

Poco चा लेटेस्ट Poco C65 फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेटसह 6.74-इंच HD+ LCD स्क्रीन आहे. या फोनमध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी Helio G85 प्रोसेसर मिळेल. सुरक्षिततेसाठी, यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. डिव्हाइस Android 13 वर आधारित MIUI 14 वर कार्य करते. कॅमेरा विभागाबद्दल बोलायचे झाल्यास, यात 50MP प्राइमरी रियर कॅमेरा, 2MP मॅक्रो कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा समाविष्ट आहे. त्याबरोबरच, फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आहे, जी 18W चार्जिंगला सपोर्ट करते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo