स्टायलिश डिझाईनसह POCO C61 स्मार्टफोन भारतात लाँच, कमी किमतीत मिळतील Powerful फिचर्स। Tech News 

स्टायलिश डिझाईनसह POCO C61 स्मार्टफोन भारतात लाँच, कमी किमतीत मिळतील Powerful फिचर्स। Tech News 
HIGHLIGHTS

POCO C61 स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच झाला आहे.

POCO C61 फोनची किंमत 7,499 रुपयांपासून सुरू होते.

फोनच्या खरेदीवर तुम्हाला HSBC कार्डवर 500 रुपयांची सूट मिळेल.

प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर POCO C61 स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच झाला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन बजेट विभागात सादर केला आहे. या फोनची विक्री लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart द्वारे केली जाईल. फोनमध्ये AI कॅमेरा उपलब्ध आहे. तर, दीर्घकाळ टिकणारी बॅटरी देखील तुम्हाला मिळणार आहे आहे. चला तर मग जाणून घेऊयात POCO C61 फोनची किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन्स-

हे सुद्धा वाचा: Jio ची Dhan Dhana Dhan ऑफर! सुपरफास्ट चालेल तुमचे इंटरनेट, मिळेल तीनपट अधिक इंटरनेट स्पीड। Tech News

POCO C61
POCO C61

POCO C61 ची भारतीय किंमत

POCO C61 स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये बाजारपेठेत लाँच करण्यात आला आहे. फोनचा बेस व्हेरिएंटमध्ये 4GB रॅमसह 64GB अंतर्गत स्टोरेज आहे. फोनची किंमत 7,499 रुपयांपासून सुरू होते. तर, हँडसेटचा टॉप व्हेरिएंट 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येतो. फोनच्या टॉप व्हेरिएंट 8,499 रुपयांना लॉन्च करण्यात आला आहे.

ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, सेलमध्ये फोन 6,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी केला जाऊ शकतो. तुम्हाला HSBC कार्डवर 500 रुपयांची सूट मिळेल. उपलब्ब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हँडसेटची विक्री 28 मार्च 2024 रोजी दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर सुरू होईल.

POCO C61 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

poco c61 display

POCO C61 मध्ये 6.7 इंच लांबीचा HD + LCD डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आणि टच सॅम्पलिंग रेट 180Hz इतका आहे. हँडसेट कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 संरक्षणासह येतो. उत्तम परफॉर्मन्ससाठी या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर MediaTek Helio G36 प्रोसेसर आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमधील 6GB व्हर्च्युअल रॅम आणि इंटरनल स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रो SD कार्डची मदत घेता येईल. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. हँडसेट Android 14 आधारित OS वर चालतो.

Poco C61 Features 2024
Poco C61 Features 2024

फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 8MP AI ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 5MP कॅमेरा उपलब्ध आहे. या बजेट रेंज स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. हे 10W चार्जिंग सपोर्टसह येते. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 3.5 मिमी हेडफोन जॅक, USB टाइप-C पोर्ट, ड्युअल बँड Wi Fi, ब्लूटूथ 5.3 आणि GNSS सारखी फीचर्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo