Poco चा आगामी स्वस्त स्मार्टफोन ‘या’ दिवशी भारतात होणार लाँच, कंपनीने शेअर केला टीझर। Tech News

Updated on 22-Mar-2024
HIGHLIGHTS

आगामी बजेट स्मार्टफोन POCO C61 च्या लाँचची तारीख जाहीर

नव्या फोनची मायक्रोसाइटदेखील Flipkart वर लाइव्ह झाली आहे.

स्मार्टफोनमध्ये 6GB पर्यंत RAM आणि 6GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम असेल.

बजेट स्मार्टफोन ऑफर करण्यासाठी प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Poco ने आपल्या नव्या स्मार्टफोनच्या लाँचसाठी सज्ज झाली आहे. होय, कंपनीने बजेट स्मार्टफोन POCO C61 च्या लाँचची तारीख जाहीर केली आहे. हा स्मार्टफोन पुढील आठवड्यात 26 मार्च रोजी भारतीय बाजारात लाँच होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, फोनचे स्पेसिफिकेशन आणि डिझाइन देखील उघड झाले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात, नवीन टीझरचे स्पेसिफिकेशन्स-

हे सुद्धा वाचा: देशी कंपनीचा नवा स्मार्टफोन Lava O2 भारतात लाँच, Affordable किमतीत मिळतायेत जबरदस्त फीचर्स| Tech News

POCO C61 चे भारतीय लाँच

वर सांगितल्याप्रमाणे, कंपनी Paco ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर आपल्या नवीन डिवाइस POCO C61 बद्दल माहिती दिली आहे. त्याबरोबरच, नव्या फोनची मायक्रोसाइटदेखील Flipkart वर लाइव्ह झाली आहे. 26 मार्च रोजी दुपारी 12:00 वाजता मोबाईल फोन लाँच होईल. टीझरमध्ये मोबाईल ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये दिसत आहे.

#Poco C61

स्मार्टफोनमध्ये 6GB पर्यंत RAM आणि 6GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम असेल, याची देखील पुष्टी करण्यात आली आहे. फोनच्या डिझाईनबद्दल बोलताना, मायक्रोसाइटनुसार, डिव्हाइस रेडिएंट रिंग डिझाइन आणि राऊंडेड कॅमेरा मॉड्यूल ऑफर करेल. ज्यामध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि LED फ्लॅश असेल. फोनच्या फ्रंट पॅनलवर फ्लॅट डिस्प्ले मिळेल.

POCO C61 चे अपेक्षित फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

गेल्या काही काळापासून POCO C61 चे तपशील ऑनलाईन लीक होत आहेत. त्यानुसार, Poco C61 फोनमध्ये 6.71 इंच लांबीचा IPS LCD HD+ डिस्प्ले असण्याची अपेक्षा आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz इतका असू शकतो. एवढेच नाही तर, स्क्रीनच्या सुरक्षेसाठी गोरिल्ला ग्लास 3 चे प्रोटेक्शन दिले जाऊ शकते. आम्ही तुम्हाला सांगतो की, नवीन Poco फोनमध्ये एंट्री लेव्हल Helio G36 चिपसेट मिळण्याची शक्यता आहे.

पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आणि 10W चार्जिंग सपोर्ट उपलब्ध असू शकते. लक्षात घ्या की, या फोनची सुरुवातीची किंमत 8000 रुपयांच्या अंतर्गत असण्याची शक्यता आहे. मात्र, फोनची खरी किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन्स हा फोन लाँच झाल्यानंतरची पुढे येतील.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :