4GB RAM सह स्वस्त POCO C61 स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत 6000 रुपयांपेक्षा कमी 

4GB RAM सह स्वस्त POCO C61 स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत 6000 रुपयांपेक्षा कमी 
HIGHLIGHTS

POCO C61 Airtel exclusive एडिशन भारतीय बाजारात लाँच

नवीन Poco स्मार्टफोन 17 जुलैपासून खरेदी केला जाऊ शकतो.

नवीन स्मार्टफोन POCO C61 Airtel exclusive एडिशन Airtel कनेक्शनसह येतो.

Xiaomi सब-ब्रँड POCO ने भारतात एक नवीन लो बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. होय, Poco C61 कंपनीने भारतीय बाजारात केवळ 6000 रुपयांपेक्षा कमी किमतीत सादर केला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, हे POCO C61 Airtel exclusive एडिशन आहे. ज्यासोबत Airtel पोस्टपेड कनेक्शन देखील उपलब्ध असेल. जाणून घेऊयात नव्या POCO C61 Airtel exclusive एडिशनची किंमत आणि सर्व स्पेक्स-

Also Read: Realme 13 Pro 5G: आगामी सिरीजची भारतीय लाँच डेट कन्फर्म! मिळेल HYPERIMAGE+ AI कॅमेरा सिस्टम

POCO C61 Airtel एडिशनची किंमत आणि विक्री

Poco C61 Airtel विशेष मोबाईल फोन केवळ 5,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, ही या स्मार्टफोनच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत आहे. हा फोन इथरियल ब्लू, डायमंड बस्ट ब्लॅक आणि मिस्टिकल ग्रीन कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करता येईल.

उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, नवीन Poco फोन 17 जुलैपासून खरेदी केला जाऊ शकतो. या फोनची विक्री शॉपिंग साइट Flipkart वर केली जाईल. एवढेच नाही तर, POCO स्मार्टफोन Airtel कनेक्शनसह येतो. या फोनमध्ये 18 महिन्यांसाठी Airtel सिम लॉक असेल.

18 महिन्यांच्या कालावधीत, कंपनीकडून तुम्हाला 50GB डेटा फ्री दिला जाईल. Airtel वापरकर्त्यांना कंपनीकडून 7.5% किंवा 750 रुपयांपर्यंत सूट देखील दिली जाईल. हा लाभ घेण्यासाठी तुम्हाला दर महिन्याला किमान 199 रुपये किंवा त्याहून अधिक किमतीचे रिचार्ज करावे लागेल.

POCO C61 Airtel एडिशन

POCO C61 Airtel एडिशनची किंमत आणि विक्री

Poco C61 फोनमध्ये 6.71 इंच लांबीचहा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ही एक IPS LCD स्क्रीन आहे, जी 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. प्रोटेक्शन्ससाठी, या फोनमध्ये गोरिला ग्लास 3 बसवण्यात आला आहे. या स्मार्टफोन्समध्ये MediaTek Helio G36 चिपसेट देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी, POCO C61 मध्ये AI तंत्रज्ञानासह ड्युअल कॅमेरा आहे. यात 8MP चा मुख्य सेन्सर आणि 5MP फ्रंट कॅमेरा आहे. पॉवरसाठी, यात 5,000mAh बॅटरी, 10W चार्जिंग स्पीड आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo