हँडसेट निर्माता Poco ने गेल्या आठवड्यात ग्राहकांसाठी परवडणारा स्मार्टफोन Poco C55 लाँच केला. आज म्हणजेच 28 फेब्रुवारीपासून या Poco मोबाईल फोनची विक्री Flipkart वर दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. सेल सुरू होण्यापूर्वी, भारतातील Poco C55 ची किंमत, Flipkart ऑफर जाणून घेऊयात…
हे सुद्धा वाचा : 50MP कॅमेरा असलेला स्वस्त Samsung फोन लाँच, कमी किमतीत मिळणार स्ट्रॉंग फीचर्स
या Poco मोबाईलच्या 4 GB रॅम सह 64 GB वेरिएंटची किंमत 9,499 रुपये आहे. तर, 6 GB रॅम / 128 GB स्टोरेज असलेले मॉडेल खरेदी करण्यासाठी, 10,999 रुपये खर्च करावे लागतील. फॉरेस्ट ग्रीन, पॉवर ब्लॅक आणि कूल ब्लू या तीन कलर ऑप्शनमध्ये फोन खरेदी केला जाऊ शकतो.
Poco C55 सह अनेक ऑफर देखील सूचीबद्ध केल्या आहेत. जसे की तुम्ही हे डिव्हाइस खरेदी करताना PNB क्रेडिट कार्ड किंवा कोणत्याही क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास, तुम्हाला 10 टक्के म्हणजेच रु. 1000 पर्यंत झटपट सूट मिळेल. Flipkart Axis Bank कार्डवर 5% कॅशबॅक दिला जात आहे.
या व्यतिरिक्त, जर तुम्हाला EMI पर्याय हवा असेल. तर तुम्ही हा डिव्हाइस 387 रुपये प्रति महिना प्रारंभिक EMI सह खरेदी करू शकता, परंतु हा फायदा बँक ऑफ बडोदाच्या 36-महिन्याच्या EMI पर्यायासह उपलब्ध आहे.
फोनमध्ये 60Hz रिफ्रेश रेटसह 6.71-इंच लांबीचा HD+ LCD डिस्प्ले आहे जो 120Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 534 nits पीक ब्राइटनेस ऑफर करतो. Poco C55 मध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी MediaTek Helio G85 चिपसेटसह 6 GB पर्यंत RAM आणि 64 GB पर्यंत स्टोरेज आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 1 TB पर्यंत वाढवता येऊ शकते.
फोनमध्ये मायक्रो-USB पोर्ट, GPS, Wi-Fi, 4G आणि ब्लूटूथ व्हर्जन 5.1 सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी फोनच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. यात 5000 mAh बॅटरी आहे, जी 10 W चार्जिंगला सपोर्ट करते.
याव्यतिरिक्त, यात 50MP प्राइमरी सेन्सर, 2MP डेप्थ सेन्सर बॅक पॅनलवर देण्यात आला आहे. समोर 5MP सेल्फी कॅमेरा सेन्सर देखील आहे.