Poco C55 Offers: फक्त 12 हजार रुपयांचा स्मार्टफोन कमी किमतीत खरेदी करण्याची संधी, बघा ऑफर्स

Poco C55 Offers: फक्त 12 हजार रुपयांचा स्मार्टफोन कमी किमतीत खरेदी करण्याची संधी, बघा ऑफर्स
HIGHLIGHTS

सध्या Poco C55 स्मार्टफोनवर अप्रतिम ऑफर्स सुरु आहेत.

इंडसलँड बँक क्रेडिट कार्ड EMI व्यवहारावर 10% फ्लॅट डिस्काउंट

ICICI बँक कार्डवरून पेमेंट केल्यावर तुम्हाला 500 रुपयांची सूट

बजेट स्मार्टफोनमध्ये Poco स्मार्टफोन भारतीय बाजारात चांगलेच लोकप्रिय आहेत. तुम्हाला देखील नवा फोन खरेदी करायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी उत्तम पर्याय घेऊन आलो आहोत. सध्या Poco C55 स्मार्टफोनवर अप्रतिम ऑफर्स सुरु आहेत. फ्लिपकार्ट तुम्हाला हा फोन कमी किमतीती खरेदी करण्याची संधी देत आहे. जाणून घेऊयात फोनवर उपलब्ध ऑफर्स- 

Poco C55 ची किंमत आणि ऑफर्स 

POCO C55 च्या 4GB + 64GB व्हेरिएंटची MRP Flipkart वर 11,999 रुपये आहे. साईटवर 35% डिस्काउंटनंतर हा फोन फक्त 7,749 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. त्याबरोबरच, यावर अनेक बँक ऑफर्सही उपलब्ध आहेत. इंडसलँड बँक क्रेडिट कार्ड EMI व्यवहारावर 10% फ्लॅट डिस्काउंट उपलब्ध आहे. तर, ICICI बँक कार्डवरून पेमेंट केल्यावर तुम्हाला 500 रुपयांची सूट मिळेल.

त्याबरोबरच, या फोनसह एक्सचेंज ऑफरदेखील मिळणार आहे, यासह तुम्ही हा फोन अगदी कवडीमोलात खरेदी करू शकता. जुना किंवा विद्यमान स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला 7,200 रुपयांची सूट मिळणार आहे. मात्र, हे लक्षात घ्या की एक्सचेंज व्हॅल्यू तुमच्या जुन्या किंवा विद्यमान स्मार्टफोनच्या स्थितीवर अवलंबून असणार आहे. येथून खरेदी करा 

Poco C55 चे मुख्य तपशील 

Poco C55 मध्ये 6.71 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याबरोबरच, फोन Mediatek Helio G85 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. आकर्षक फोटोग्राफीसाठी तुम्हाला 50MP रियर कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo