स्मार्टफोन निर्माता कंपन्या सातत्याने बजेट सेगमेंटमधील स्मार्टफोन्स आणत आहेत. एवढेच नाही, तर बजेट रेंजमध्ये ग्राहकांना उत्तमोत्तम फीचर्स मिळावेत म्हणून कंपन्या सतत प्रयत्नात आहेत. आता स्मार्टफोन निर्माता कंपनी POCOने प्रीमियम लुकसह बजेट सेगमेंटमध्ये POCO C51 हा अप्रतिम फोन लाँच केला आहे. या फोनची किंमत, लॉन्चिंग ऑफर आणि स्पेसिफिकेशन्स सविस्तर बघुयात-
POCO C51 ची किमंत 8,499 रुपये इतकी आहे. मात्र, लॉन्चिंग ऑफरअंतर्गत तुम्ही हा फोन केवळ 7,799 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. हा फोन 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. या फोनची विक्री 10 एप्रिलपासून फ्लिपकार्टवर सुरु होणार आहे. फोन रॉयल ब्लु आणि पॉवर ब्लॅक कलरमध्ये खरेदी करता येईल.
या फोनमध्ये 6.52 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये मीडियाटेक Helio 36 प्रोसेसर उपलब्ध आहे. हा फोन 4GB रॅमसह 3GB व्हर्च्युअल रॅमचा सपोर्ट देखील देतो. म्हणजेच तुम्हाला यात एकूण 7GB रॅमचा लाभ मिळणार आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास फोनमध्ये 64GB स्टोरेज देण्यात आली आहे.
POCO C51मध्ये 5000mAh बॅटरी आहे, ज्यासोबत 10W चार्जिंगचे समर्थन आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये हेडफोन जॅक, 4G, ब्लूटूथ आणि चार्जिंग पोर्ट आहे. सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सरदेखील देण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी फोनच्या रियरमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. ज्याचा प्रायमरी लेन्स 8MP चा आहे. तसेच आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 5MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या कॅमेरासह बरेच मोड्सदेखील मिळतील.