POCO C51 लेटेस्ट स्मार्टफोनची विक्री सुरु, सेल ऑफरमध्ये मिळेल स्वस्तात

Updated on 13-Apr-2023
HIGHLIGHTS

POCO C51 ची भारतात सेल सुरु

हा कंपनीचा नवीन लाँच झालेला बजेट स्मार्टफोन आहे.

सेल ऑफरअंतर्गत फोन एक हजार रुपयांचा सवलतीसह मिळणार आहे.

POCO C51 हा बजेट स्मार्टफोन नुकताच कंपनीने लाँच केला आहे. मागील आठवड्यातच हा फोन लाँच करण्यात आला. त्यानंतर आज या स्मार्टफोनची पहिली सेल सुरु झाली आहे. होय, फ्लिपकार्टवर आज 12 वाजतापासून हा फोन खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये बरेच जबरदस्त फीचर्स मिळत आहेत. 

POCO C51 ची किंमत

POCO C51 च्या (4GB+64GB) व्हेरिएंटची किंमत 8,499 रुपये आहे. हा फोन ब्लॅक आणि रॉयल ब्लु कलरमध्ये खरेदी करता येणार आहे. सेल ऑफरअंतर्गत हा फोन तुम्हाला 7,799 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

POCO C51 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

 या फोनमध्ये 6.52 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये मीडियाटेक Helio 36 प्रोसेसर उपलब्ध आहे. हा फोन 4GB रॅमसह 3GB व्हर्च्युअल रॅमचा सपोर्ट देखील देतो. म्हणजेच तुम्हाला यात एकूण 7GB रॅमचा लाभ मिळणार आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास फोनमध्ये 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. 

 POCO C51मध्ये 5000mAh बॅटरी आहे, ज्यासोबत 10W चार्जिंगचे समर्थन आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये हेडफोन जॅक, 4G, ब्लूटूथ आणि चार्जिंग पोर्ट आहे. सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सरदेखील देण्यात आला आहे. 

फोटोग्राफीसाठी फोनच्या रियरमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. ज्याचा प्रायमरी लेन्स 8MP चा आहे. तसेच आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 5MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या कॅमेरासह बरेच मोड्सदेखील मिळतील. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :