Poco C51 Airtel Exclusive: नव्या रंग-रूपात लाँच झाला स्वस्त स्मार्टफोन, 50GB डेटा फ्री

Poco C51 Airtel Exclusive: नव्या रंग-रूपात लाँच झाला स्वस्त स्मार्टफोन, 50GB डेटा फ्री
HIGHLIGHTS

Poco C51 Airtel Exclusive व्हेरिएंट स्वस्तात लाँच

यूजर्सना या फोनमध्ये Airtelचे अनेक विशेष फायदे देखील मिळतील.

यात 50GB मोफत डेटासह 10GB डेटाचे पाच मोफत कूपन मिळतील.

Poco C51 हा कंपनीचा बजेट स्मार्टफोन एप्रिल महिन्यात लाँच करण्यात आला होता. मात्र, आता कंपनीने या फोनचा Airtel Exclusive व्हेरिएंट लाँच केला आहे. मात्र, नवा व्हेरिएंट मूळ व्हेरिएंटपेक्षा खूप स्वस्त किमतीत सादर झाला आहे. त्याबरोबरच, यूजर्सना या फोनमध्ये Airtelचे अनेक विशेष फायदे देखील मिळतील. यात 50GB मोफत डेटासह 10GB डेटाचे पाच मोफत कूपन मिळतील. 

नावावरुन समजले असेल की, Poco चे हे खास एअरटेल मॉडेल केवळ 18 महिन्यांसाठी एअरटेलसाठी प्री-लॉक केले जाणार आहे. तुम्हाला या फोनमध्ये एअरटेल सिम टाकावे लागेल. सर्व अटी पूर्ण झाल्यास तुम्ही एअरटेल नसलेले सिम दुसऱ्या सिम स्लॉटमध्ये वापरू शकता. 

Poco C51 Airtel Exclusive ची किंमत आणि ऑफर्स 

 

 

कंपनीने Poco C51 स्मार्टफोनची किंमत 5,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. फ्लिपकार्टवर 18 जुलैपासून फोनची सेल सुरू होणार आहे. कंपनीने हा फोन Airtel Exclusive बेनिफीट्ससह लॉन्च केला आहे. यासह, ग्राहकांना फोनवर 7.5% पर्यंत सूट दिली जाईल आणि 50GB डेटा फ्री मिळेल. तसेच, फोनसोबत 10GB डेटासह 5 कूपन दिले जातील. एका महिन्यात फक्त 1 कूपन वापरता येईल, जो 30 दिवसांसाठी वैध असणार आहे.

नवा व्हेरिएंट वापरण्यासाठी अटी 

Poco C51 स्पेशल वेरिएंट 18 महिन्यांपर्यंतच्या एअरटेल प्री-लॉक सिस्टमसह येतो. फोन सेट केल्यानंतर एका दिवसाच्या आत यूजरला फोनमध्ये Airtel चे सिम टाकावे लागेल. या सिममध्ये Airtel Truly Unlimited किमान 199 रुपयांचे रिचार्ज करणे आवश्यक आहे. 

वरील सर्व अटी पूर्ण केल्यानंतरच, वापरकर्ता फोनमध्ये Airtel नसलेले सिम वापरण्यास सक्षम असेल. हा फोन विद्यमान एअरटेल ग्राहकांसाठी आणि सर्व नवीन ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.

Poco C51 

 Poco फोनमध्ये 6.52 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे. याशिवाय, फोन MediaTek Helio G36 प्रोसेसरने सुसज्ज आहे, 4GB RAM + 3GB व्हर्च्युअल रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेज आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 8MP ड्युअल कॅमेरा सेटअप आणि 5MP फ्रंट कॅमेरा आहे. फोनची बॅटरी 10W चार्जिंग स्पीडसह 5000mAh आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo