POCO C51 Airtel Edition: स्मार्टफोनची पहिली सेल आज, मोफत मिळेल 50GB डेटा

Updated on 19-Jul-2023
HIGHLIGHTS

POCO C51 Airtel Edition ची भारतात पहिली सेल आजपासून Flipkart वर सुरु होणार

या स्मार्टफोनची किंमत 5,999 रुपये आहे.

Airtel 50GB डेटा आणि यासह प्रत्येकी 10GB चे पाच कूपन देखील देईल.

POCO C51 Airtel Edition ची पहिली सेल आजपासून भारतात सुरू होणार आहे. ग्राहकांना हा फोन Flipkart वरून खरेदी करता येणार आहे. तसेच, ऑफर म्हणून यासह 50GB डेटा मोफत मिळेल. तसेच, फोनवर बँक डिस्काउंट सारख्या डील्स देखील उपलब्ध असतील. 

POCO C51 Airtel Edition किंमत आणि ऑफर्स

POCO C51 स्मार्टफोनच्या एअरटेल एडिशनची विक्री Flipkart दुपारी 12 वाजता सुरू होईल. या स्मार्टफोनची किंमत 5,999 रुपये आहे. Axis बँकेकडून ग्राहकांना 1000 रुपयांपर्यंत सूट आणि 5% कॅशबॅक मिळेल. त्याबरोबरच, Airtel 50GB डेटा आणि यासह प्रत्येकी 10GB चे पाच कूपन देखील देईल, जे 30 दिवसांसाठी वैध असेल. तसेच, ग्राहकांना एका महिन्यात फक्त एक डेटा कूपन वापरता येईल. 

POCO C51 चे फीचर्स

Poco C51 स्मार्टफोनमध्ये 6.52-इंच लांबीचा HD Plus डिस्प्ले मिळेल. यामध्ये MediaTek Helio G36 प्रोसेसर सोबत 4GB RAM, 3GB व्हर्च्युअल रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेज मिळेल. हा मोबाईल Android 13 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. याव्यतिरिक्त, फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात 8MP मुख्य लेन्स आणि सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 5MP कॅमेरा आहे. स्मार्टफोनमध्ये 5000mAh जंबो बॅटरी आहे, जी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

महत्त्वाचे:

Poco C51 चे एअरटेल एडिशन 18 महिन्यांच्या प्री-लॉक सिस्टमसह येतो. यामध्ये 199 रुपयांचे रिचार्ज करणे आवश्यक आहे. त्यानंतरच यूजर्स फोनमध्ये नॉन-एअरटेल सिम वापरू शकतील.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :