हँडसेट निर्मात्या Poco ने मागील आठवड्यात Poco C50 लाँच केले आहे आणि आजपासून या डिव्हाइसची विक्री Flipkart वर सुरू होत आहे. हा Poco मोबाइल फोन Android 12 G/o Edition आणि मोठ्या डिस्प्लेसह मजबूत बॅटरीसह लॉन्च करण्यात आला होता. Poco C50 च्या भारतातील किंमतीपासून ते त्याच्या फीचर्सपर्यंत तपशीलवार माहिती बघुयात…
हे सुद्धा वाचा : सर्व कंपन्यांचे डेली 3GB डेटा प्लॅन, अमर्यादित कॉलिंगसह मिळतील अनेक लाभ
या Poco स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट आहेत, एका व्हेरियंटमध्ये 2 GB RAM सह 32 GB स्टोरेज आहे, तर दुसऱ्या व्हेरिएंटमध्ये 3 GB RAM सह 32 GB अंतर्गत स्टोरेज आहे. 2 GB रॅम असलेले मॉडेल खरेदी करण्यासाठी तुम्हाला 6 हजार 249 रुपये खर्च करावे लागतील. 3 GB रॅम व्हेरिएंट खरेदी करण्यासाठी, तुम्हाला 6,999 रुपये द्यावे लागतील. हे उपकरण रॉयल ब्लू आणि कंट्री ग्रीन या दोन कलरमध्ये खरेदी केले जाऊ शकते. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर आज दुपारी 12 वाजल्यापासून Poco C50 स्मार्टफोनची विक्री सुरू झाली आहे.
जर तुम्ही देखील हे डिव्हाइस खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, या हँडसेटसह तुम्हाला काही उत्तम ऑफर देखील मिळतील. जसे की, तुम्हाला फ्लिपकार्ट ऍक्सिस बँक कार्डद्वारे बिल पेमेंटवर 5 टक्के कॅशबॅक मिळेल. याशिवाय, दरमहा केवळ 226 रुपयांची EMI सुरू करण्याची सुविधा देखील आहे. तुम्हाला तुमचा जुना फोन एक्सचेंज करायचा असेल तर, 5 हजार 950 रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटचा लाभ मिळेल.
या Poco फोनमध्ये 120Hz टच सॅम्पलिंग रेटसह 6.52-इंच लांबीचा HD प्लस डिस्प्ले आहे, जो 720×1600 पिक्सेल रिझोल्यूशनसह स्क्रीन ऑफर करतो. हा फोन Android 12 Go Edition वर चालतो. फोनला पॉवर देण्यासाठी Poco C50 मध्ये 10W चार्ज सपोर्ट असलेली 5000 mAh बॅटरी प्रदान करण्यात आली आहे.
स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी कंपनीने Poco C50 स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio A22 प्रोसेसर वापरला आहे. तसेच, या डिव्हाइसमध्ये 3 GB LPDDR4x रॅमसह 32 GB अंतर्गत स्टोरेज आहे. फोनच्या मागील बाजूस दोन रियर कॅमेरे देण्यात आले आहेत, 8 मेगापिक्सेल AI प्राइमरी सेन्सरसह डेप्थ कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे.