बऱ्याच टेक कंपन्या आता सामान्य ग्राहकांना परवडेल अशा किमतीत जबरदस्त फीचर्स आणि लुकसह स्मार्टफोन्स बाजारात उपलब्ध करून देत आहेत. यामध्ये आता आणखी एक नाव जुळले आहे. Poco Global ने अलीकडेच 16 जून रोजी Poco C40 लाँच करण्याची घोषणा केली आहे. मात्र, कंपनीच्या व्हिएतनाम युनिटने आजच हा बजेट स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीने स्मार्टफोनबद्दल सर्व काही माहिती म्हणजेच फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत उघड केली आहे. चला तर जाणून घेऊयात या स्मार्टफोनबद्दल सविस्तर माहिती…
व्हिएतनाममध्ये Poco C40 ची किंमत 3,490,000 VND म्हणजेच 11,688 रुपये आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक, यलो किंवा ग्रीन कलर ऑप्शनमध्ये येऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज आहे. हा स्मार्टफोन 17 जूनपासून देशात विक्रीसाठी उपलब्ध होईल. एका लीकनुसार, स्मार्टफोन जागतिक स्तरावर $177 म्हणजेच 13,743 रुपयांना मिळू शकतो.
हे सुद्धा वाचा: हिरामंडीसाठी Netflix कोट्यवधी रुपये खर्च करणार, संजय लीला भन्साळींची फीस ऐकून बसेल धक्का
Poco C40 मध्ये 1560 x 720 पिक्सेल HD+, 60Hz रिफ्रेश रेट आणि 400 nits पर्यंत पीक ब्राइटनेस रिझोल्यूशनसह 6.71-इंच लांबीचा LCD डिस्प्ले आहे. त्याबरोबरच, प्रोसेसरबद्दल बोलायचं झालं तर या स्मार्टफोनमध्ये JLQ JR10 SoC देण्यात आला आहे. या चिपने सुसज्ज असलेला हा पहिला लोकप्रिय स्मार्टफोन आहे. ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर, हा स्मार्टफोन Android 11 वर आधारित MIUI वर काम करतो. याव्यतिरिक्त, कनेक्टिव्हिटीसाठी या स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम कार्ड स्लॉट, 4G कनेक्टिव्हिटी, ड्युअल-बँड WiFi, ब्लूटूथ 5.0, GNSS आणि USB टाइप-C पोर्ट आहे.
याशिवाय, या स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 13 मेगापिक्सलचा पहिला कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या फ्रंटला 5 मेगापिक्सेल सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी कॅमेरा देण्यात आला आहे. इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात एक मायक्रो SD कार्ड स्लॉट, 3.5 मिमी हेडफोन जॅक आणि रियर माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. या स्मार्टफोनची लांबी 169.59 मिमी, रुंदी 76.56 मिमी, जाडी 9.18 मिमी आणि वजन 204 ग्रॅम आहे. तसेच, या स्मार्टफोनमध्ये 6,000mAh बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. मात्र, या स्मार्टफोनसोबत फक्त 10W चा चार्जर येतो.