थंड तापमानात Pixel 2 XL बंद करतो रॅपिड चार्जिंग
Pixel 2 XL यूजर्स नुसार जर तापमान 20 डिग्री सेल्सियस पेक्षा खाली गेल्यास त्यांचा फोन रॅपिड चार्जिंग थांबवतो आणि याला लवकर चार्ज करण्यासाठी फोनला वार्म करण्याचा सल्ला दिला जात आहे.
जर तुम्हाला वाटतय की थंडी मध्ये तुमचा Pixel 2 XL धीम्या गतीने चार्ज होत आहे, तर तुम्ही बरोबर आहात. पिक्सल यूजर कम्युनिटी ने चार्जिंग स्पीड कमी होत असल्याचे नोटिस केले आहे.
Pixel2 XL यूजर्स ने तक्रार केली आहे की तापमान 20 डिग्री सेल्सियस पेक्षा खाली गेल्यास फोन जवळपास 750mA वर चार्ज होतो. पण जर बॅटरी 22-23 डिग्री सेल्सियस वर राहिल्यास फोन 3A च्या हाय स्पीड ने चार्ज होतो.
रिपोर्ट नुसार गूगल या इशूज वर काम करत आहे. आता फोनला लवकर चार्ज करण्यासाठी फक्त एक उपाय असा आहे की चार्ज करण्या आधी वार्म अप करावे. पिक्सल यूजर कम्युनिटी च्या एक सदस्य Krzysztof Borczuch ने लिहिलय, “एका यूजर नुसार, हा उपाय केल्यास फोन लवकर चार्ज होतो. जर माझा अंदाज योग्य असेल तर ह्या उपायाने तुमचा फोन लवकर चार्ज झाला पाहिजे तुम्ही तुमच्या फोनला कोणत्याही वार्म सर्फेस वर ठेवून वार्म अप करू शकता (उदा. तुमचा हात) किंवा फोन ची पॉवर ऑफ करून, CPU च्या वापराने (AR स्टीकर्स पण सहज बॅटरी वार्म अप करू शकतात)”.
फोन मध्ये गूगल ने क्वॉलकॉम ची क्विक चार्ज टेक्निक ऐवजी USB-C पॉवर डिलीवरी चा वापर केल्याने ही समस्या निर्माण झाली असू शकते.
इतक्या समस्या असूनही सध्यातरी Pixel 2 XL बेस्ट फोंस पैकी एक आहे, जर तुम्ही फोटो घेण्याचे शौकिना असाल तर. Pixel 2 XL एक बेस्ट कॅमेरा फोन आहे आणि काही बाबतीत हा iPhone X पेक्षा चांगला फोन आहे.