5G नेटवर्कमध्ये फोनची बॅटरी लवकर संपतेय? लगेच बदला ‘ही’ सेटिंग

Updated on 27-Apr-2023
HIGHLIGHTS

5G ही एक नवीन टेक्नॉलॉजी आहे, जी जास्त उर्जा वापरते.

5G नेटवर्क तुमच्या फोन बॅटरी लवकर संपत आहे.

काळजी करू नका फक्त एक सेटिंग बदला.

तुम्ही जर 5G क्षेत्रात राहत असाल तर तुम्ही मनसोक्तपणे 5G स्पीडचा लाभ घेऊ शकता. पण 5G नेटवर्क आल्यापासून एका समस्येचा मात्र सामना करावा लागतोय. ती म्हणजे तुमच्या फोन बॅटरी लवकर संपत आहे. फोनची बॅटरी लवकर संपण्याचे कारण 5G नेटवर्क असू शकते. काही वापरकर्त्यांना असे वाटते की 5G मुळे त्यांच्या फोनची बॅटरी लवकर संपते. 

 5G ही एक नवीन टेक्नॉलॉजी आहे, जी जास्त उर्जा वापरते. हे लक्षात घेऊन काही लोक 4G नेटवर्कवर स्विच करू पाहत आहेत. 5G वर स्विच केल्यानंतर तुम्हाला आता 4G वापरायचा असेल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. खाली दिलेल्या प्रक्रिया फॉलो करा.

 

5G वरून 4G वर कसे स्विच करावे ?

Android :

सर्वप्रथम तुम्ही तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये जा. यानंतर नेटवर्क आणि इंटरनेट पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला 'मोबाईल नेटवर्क' मध्ये जावे लागेल. यामध्ये तुम्हाला आधी नेटवर्क आणि नंतर 4G असे निवडावे लागेल.

iPhone :

येथे देखील वरील प्रक्रियेप्रमाणे आधी फोनच्या सेटिंग्जमध्ये जा. येथे तुम्ही 'Cellular' ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. येथे 'Cellular data options' वर टॅप करा. येथे तुम्हाला 5G, 4G किंवा LTE पर्याय दिसतील. तुम्हाला हवे असलेले नेटवर्क निवडा.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :