फिलिप्स S653H, ५.५ इंचाच्या ह्या स्मार्टफोनला अधिकृतरित्या लाँच केले गेले आहे. हे फोटो पाहून असे सांगू शकतो की, हा एक आकर्षक मेटल बॉडी असलेला स्मार्टफोन असू शकतो.
फिलिप्स S653H, ५.५ इंचाच्या ह्या स्मार्टफोनला अधिकृतरित्या लाँच केले गेले आहे. हे फोटो पाहून असे सांगू शकतो की, हा एक आकर्षक मेटल बॉडी असलेला स्मार्टफोन असू शकतो.
हा आपल्याला FHD IPS डिस्प्लेसह एक आकर्षक स्लीक मेटल बॉडीसह मिळत आहे आणि ह्या स्मार्टफोनच्या डिझाईनवर कंपनीला खूप गर्व होत आहे. कंपनीचे म्हणणे आहे, ह्याची सर्वात खास गोष्ट म्हणजे हा ६.९५ एमएम इतका पातळ आहे.
त्याशिवाय फिलिप्सने ह्या स्मार्टफोनच्या डिझाईनमध्ये एक एंटिनाचा समावेश केला आहे. तसेच एक उत्कृष्ट फीचर दिले आहे, ते म्हणजे फिंगरप्रिंट सेंसर.
ह्या स्मार्टफोनमध्ये 2GHz ऑक्टा-कोर मिडियाटेक हेलिओ P10 प्रोसेसर असेल. ह्यात आपल्याला 3GB ची रॅम मिळत आहे. त्याशिवाय 32GB चे अंतर्गत स्टोरेज मिळत आहे, ज्याला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवू शकतो. ह्यात आपल्याला 8 मेगापिक्सेलचा 720p कॅमेरा दिला गेला आहे, तसेच ८ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरासुद्धा दिला गेला आहे.
त्याशिवाय ह्यात आपल्याला 9V/1.8A चार्जरसुद्धा मिळत आहे, जो फास्ट चार्जिंगने सुसज्ज आहे. ह्यात एक USB टाइप -C पोर्टसुद्धा आहे. ह्यात 5.5 इंचाची डिस्प्ले आणि 2550mAh क्षमतेची बॅटरी मिळत आहे.