मोबाईल निर्माता कंपनी फिकॉमने आपला नवीन स्मार्टफोन एनर्जी 653 बाजाराता लाँच केला आहे. कंपनीने ह्या स्मार्टफोनची किंमत ४९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा एक 4G स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन फक्त ऑनलाइन शॉपिंग साइट स्नॅपडीलवर उपलब्ध होईल.
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५ इंचाची HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1280×720 पिक्सेल आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन 1.1GHz क्वाड-कोर प्रोसेसर आणि 1GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 8GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले गेले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 64GB पर्यंत वाढवू शकतो.
त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि २ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 5.1 लॉलीपॉपवर चालतो.
कनेक्टिव्हिटीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये 4G LTE, ब्लूटूथ आणि वायफाय फीचर्स समाविष्ट आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये २,३००mAh बॅटरी दिली आहे. हा कंपनीनुसार 7 तास टॉकटाईम आणि २५० तासांचा स्टँडबाय टाईम देण्यास सक्षम आहे.
अॅमझॉनवर खरेदी करा फिकॉम एनर्जी 653 फक्त Rs. 4999