शीतपेयाची निर्माता कंपनी पेप्सीकोसुद्धा लवकरच आपला स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. पेप्सीच्या ह्या स्मार्टफोनचे नाव असेल पेप्सी P1. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पेप्सीने स्मार्टफोन बनवण्यासाठी एका कंपनीसोबत करार केला आहे.
कंपनीद्वारा मिळालेल्या माहितीनुसार, ह्या स्मार्टफोनला Pepsico Inc बनवणार नाही, तर त्याची भागीदार कंपनी बनवणार ज्याच्यासोबत ह्या कंपनीने करार केला होता. तथापि, ह्या स्मार्टफोनवर पेप्सीचा लोगो असेल आणि हे पेप्सीच्या नावानेचे विकले जातील. कंपनीच्या म्हणण्यानुसार, सध्यातरी ह्या स्मार्टफोनचे मर्यादित उत्पादन केले जाईल आणि फक्त चीनमध्येच हा उपलब्ध होईल. ह्याच्या किमतीबाबत अजून काहीच खुलासा केला गेला नाही.
हल्लीच ह्या स्मार्टफोनचे फोटो लीक झाले होते, ज्यात फिंगरप्रिंट सेंसर दिसत होता. हा चित्रांना एका चीनी वेबसाइटने लीक केले होते.
काही लीक्सनुसार, ह्या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंचाची पुर्ण HD डिस्प्ले असू शकते. त्याचबरोबर ह्यात २जीबी रॅम आणि मीडियाटेक MT6592 चिपसेट असल्याची शक्यता आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये ३०००mAh ची बॅटरी असू शकते. ह्याचा रियर कॅमेरा १३ मेगापिक्सेल आणि फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सेल असेल. पेप्सीचा हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड ५.१ लॉलीपॉपवर चालेल.