पेप्सीने आपला पहिला अॅनड्रॉईड स्मार्टफोन P1 लाँच केला आहे. कंपनीने सध्यातरी हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला आहे. मात्र लवकरच हा इतर देशांतसुद्धा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
पेप्सी P1 फोनमध्ये पेप्सीची फक्त ब्रँडिंग आहे, मात्र ह्या हँडसेटचा निर्माण स्कूबी कम्युनिकेशन इक्युपमेंट कंपनीने केला आहे. ह्या फोनला दोन संस्करणमध्ये लाँच केले गेले आहे. त्याच्या स्टँडर्ड संस्करणचे नाव पेप्सी P1 आहे, तर चीनी युनिकॉम संस्करण जे FDD-LTE सपोर्टसह आहेत, ते P1S नावारुपास आले आहे.
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5 इंचाची स्क्रीन दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080×1920 पिक्सेल आहे. ह्या स्मार्टफोनची डिस्प्ले 2.5D कर्व्ह ग्लास तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. त्याचबरोबर ह्यात मिडियाटेक MT6592 चिपसेट, 64 बिट्सचे ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि 2GB टी रॅम दिली गेली आहे. हा स्मार्टफोन 16GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डने वाढवता येऊ शकते.
ह्या स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. फोन डीडो ओएसवर काम करतो, जो अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 5.1 लॉलीपॉपवर आधारित आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये ३०००mAh ची बॅटरी दिली गेली आहे.
ह्या स्मार्टफोनला अॅल्युमिनियम युनीबॉडीमध्ये सादर केले आहे, त्याचबरोबर ह्यात फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा दिला गेला आहे. ड्यूल सिम आधारित ह्या फोनमध्ये दुसरा स्लॉट हायब्रीड आहे. जेथे स्लॉटमध्ये आपण सिम किंवा मायक्रोएसडी कार्ड ह्या दोघांपैकी कोणत्यातरी एकाचा वापर करु शकता. पेप्सी P1 निळा, सोनेरी आणि चंदेरी ह्या तीन रंगात येतो.