केवळ ४०,९८३ रुपयात अॅप्पल आयफोन 6S होऊ शकतो तुमचा

केवळ ४०,९८३ रुपयात अॅप्पल आयफोन 6S होऊ शकतो तुमचा
HIGHLIGHTS

पेटीएम अॅप्पल आयफोन 6S च्या 16GB व्हर्जनवर १०,००० रुपयाचा कॅशबॅक देत आहे. ह्याचाच अर्थ असा की, आता हा आपल्याला ४०,९८३ रुपयात मिळत आहे.

मोबाईल निर्माता कंपनी अॅप्पलने २०१५ मध्ये आपले दोन नवीन स्मार्टफोन आयफोन 6S आणि आयफोन 6S प्लस सादर केले होते. कंपनीने लाँचच्या वेळी आयफोन 6S 16GB व्हर्जनला ६२,००० च्या किंमतीत सादर केले होते. तथापि, अनेक ऑनलाइन साइट्सवर हा स्मार्टफोन ब-याच कमी किंमतीत मिळत आहे, मात्र आता आयफोन 6S 16GB व्हर्जनला आपण केवळ ४०,९८३ रुपयात खरेदी करु शकता.

 

खरे पाहता, पेटीएम अॅप्पल आयफोन 6S च्या 16GB च्या व्हर्जनला ५०,९८२ किंमतीत देत आहे, पण त्याचबरोबर पेटीएम ह्यावर १०,००० रुपयाचा कॅशबॅकसुद्धा देत आहे. ह्याचाच अर्थ असा की, आता हा आपल्याला ४०,९८३ रुपयात मिळत आहे. तथापि, ही ऑफर कॅश ऑन डिलिवरीवर उपलब्ध नाही. त्याचबरोबर पेटीएम आयफोन 6S आणि आयफोन 6 वरसुद्धा १०,००० चा कॅशबॅक देत आहे.

ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, अॅप्पल आयफोन 6S आपल्या आधीच्या मॉडलपेक्षा थोडा पातळ आणि जड आहे. त्याचबरोबर ह्यात काही खास फीचरसुद्धा आहेत. ह्यात फोर्स टच फीचर आहे. हा तीन वेगवेगळ्या (टच, प्रेस आणि डीपर प्रेस) च्या टचमधील अंतर करु शकतो. हे फीचर अॅप्पल स्मार्टवॉच मध्ये पहिले दिल्या गेलेल्या फीचरचे पुढील जनरेशन व्हर्जन आहे. ह्यामुळे टचचा अनुभव आणखीन वाढेल आणि रिस्पॉन्स टाइम कमी होईल, ज्यामुळे ह्याचे अॅप्स अजून तेजीने काम करतील.

त्याचबरोबर आयफोन 6S मध्ये आयसाइट सेंसरसह १२ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि फेसटाइम सेंसरसह ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिगं कॅमेरा दिला आहे.

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo