अवकाळी पावसामुळे चेन्नई पूरग्रस्त झाली आहे आणि त्यामुळे तेथील जनजीवनही विस्कळीत झाले आहे. अशा संकटसमयी ऑनलाइन रिचार्ज पोर्टल पेटीएमने पूरग्रस्त चेन्नईतील लोकांच्या मदतीसाठी मोबाईलला मोफत रिचार्ज करण्याची योजना बनविली आहे.
पेटीएमच्या मोबाईलमध्ये मोफत रिचार्ज करण्याच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी चेन्नईमध्ये अडकलेल्या लोकांना १८००१०३००३३ वर कॉल करुन मोबाईल रिचार्ज करण्यासाठी मोबाईल नंबर शेअर करावा लागेल. असे केल्यानंतर पेटीएमद्वारा कोणत्याही शुल्काशिवाय ३० रुपयाचे रिचार्ज केले जाईल. पेटीएमचा उद्देश नैसर्गिक आपत्तीशी लढत असलेल्या लोकांना त्यांच्या प्रियजनांसोबत जोडून ठेवणे हा आहे.
त्याचबरोबर दूरसंचार कंपनी एयरटेलने पूरग्रस्त चेन्नईमध्ये ग्राहकांच्या मदतीसाठी विशेष योजनांच्या घोषणांमध्ये ३० रुपयाचा किमान बॅलेंस टाकण्याची सुविधा सुरु केली आहे. तसेच वोडाफोनही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले आहे.
तामिळनाडूत झालेल्या ह्या अवकाळी पावसाने १०० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड तोडला आहे आण त्यामुळे चेन्नई, तिरुवल्लुर आणि कांचिपुरमसमवेत तमिळनाडूतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.