ह्या सुविधेच्या माध्यमातून आपल्याला ह्या बटनला केवळ जास्त वेळ दाबून ठेवायच आहे आणि असे करता क्षणीच तुमच्या कुटूंबाला किंवा मित्रपरिवाराला आपोआपच एक अलर्ट जाईल. त्याशिवाय तुमचे ठिकाणसुद्धा कळेल.
आम्ही ह्याआधी असे सांगितले होते की, २०१७ मध्ये भारतात विकल्या जाणा-या सर्व स्मार्टफोन्समध्ये “पॅनिक बटन” असणार आहे. आता ह्याविषयी सरकारकडून काही माहिती समोर आली आहे. त्यात असे म्हटले आहे की, जानेवारी 2018 मध्ये सर्व फोन्समध्ये GPS नेविगेशन सिस्टमसुद्धा सक्तीचे केले जाईल. दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली आहे. ह्याविषयी एक अधिसूचना २२ एप्रिलला जारी केली गेली होती. महिला सुरक्षा लक्षात घेऊन “पॅनिक बटन” ला सर्व फोन्समध्ये सक्तीचे करण्याबाबत विचार केला गेला आहे.
काय आहे हे “पॅनिक बटन”?
ह्या सुविधेच्या माध्यमातून आपल्याला केवळ ह्या बटनाला जास्त वेळ दाबून ठेवायच आहे आणि असे करता क्षणीच तुमच्या कुटूंबाला किंवा मित्रपरिवाराला आपोआपच एक अलर्ट जाईल. त्याशिवाय तुमचे ठिकाणसुद्धा कळेल. हे पाऊल महिला तसेच बालविकास मंत्रालय आणि आयटी व टेलिकम्युनिकेशनच्या मदतीने आणि सहयोगाने पुढे टाकण्यात आलय. त्याशिवाय जे फोन्स आधीच तयार झालेले आहेत, त्यावर चर्चा केली जात आहे आणि अजून त्यासंबंधी योजना बनविणे बाकी आहे. ह्याबाबत अधिका-यांचे म्हणणे आहे की, हे काम लवकरच पुर्ण केले जाईल आणि ह्या मोबाइल्समध्ये हे फीचर आणले जाऊ शकते.