पॅनेसोनिक बाजारात आपले दोन नवीन स्मार्टफोन्स T44 आणि T30 लाँच केले. पॅनेसोनिक T44 ची किंमत ४,२९० रुपये आणि T30 ची किंमत ३,२९० रुपये ठेवण्यात आली आहे. T44 तीन रंगात मिळतील. तर T30 सुद्धा तीन मेटॅलिक रंगात उपलब्ध होतील.
ह्या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 4 इंचाची WVGA डिस्प्ले दिली आहे. ह्यात 1.3GHz क्वाड-कोर प्रोसेसरसुद्धा आहे. ह्यात 5 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा LED फ्लॅश देण्यात आला आहे. तसेच २ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा देण्यात आला आहे. T44 अॅनड्रॉईड मार्शमॅलो 6.0 ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल. ह्यात 1GB ची रॅम आणि 8GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा असेल. तर T30 अॅनड्रॉईड लॉलीपॉप 5.1 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो, ह्यात 512MB रॅम आणि 4GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा देण्यात आले आहे, ह्या स्टोरेजला 32GB पर्यंत वाढवूही शकतो.
हेदेखील पाहा – 3GB रॅमसह येणारे १० बजेट स्मार्टफोन्स
T44 आणि T30 स्मार्टफोनसह फ्री प्रोटेक्टिव स्क्रीन गार्ड मिळत आहे, ज्याची किंमत २९९ रुपये आहे. दोन्ही स्मार्टफोन्स ड्यूल सिम आहे आणि ह्यात 3G, ब्लूटुथ, वायफाय, GPS सारखे कनेक्टिव्हिटी पर्याय दिले आहेत. T44 मध्ये 2400mAh ची बॅटरी आणि T30 मध्ये 1400mAh ची बॅटरीसुद्धा दिली आहे. T44 ला रोझ गोल्ड, शॅम्पेन गोल्ड आणि इलेक्ट्रिक ब्लू रंगात लाँच केले गेले आहे, तर T30 मेटॅलिक सिल्वर, मेटॅलिक गोल्ड आणि स्टील ग्रे रंगात मिळत आहे.
हेदेखील वाचा – लेनोवोच्या प्रोजेक्ट टँगोवर आधारित असलेला PHAB 2 प्रो स्मार्टफोन लाँच
हेदेखील वाचा – Envent LiveFree 570, 530 वॉटरप्रूफ ब्लूटुथ स्पीकर्स लाँच, किंमत अनुक्रमे ३९९९ रुपये, २४९९ रुपये