पॅनेसोनिक P75 स्मार्टफोन अधिकृतरित्या लाँच, किंमत ५,९९० रुपये

पॅनेसोनिक P75 स्मार्टफोन अधिकृतरित्या लाँच, किंमत ५,९९० रुपये
HIGHLIGHTS

ह्या स्मार्टफोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे ह्यात 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

स्नॅपडिलवर खरेदी करा पॅनेसोनिक P75 ५५५५ रुपये

मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी पॅनेसोनिकने बाजारात आपला नवीन फोन P75 अधिकृतरित्या लाँच केला आहे. काही दिवसांपूर्वी ह्या फोनला ऑनलाइन शॉपिंग साइट स्नॅपडिलवर लिस्ट केले गेले होते. ह्या स्मार्टफोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे ह्यात 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

ह्या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाची HD IPS डिस्प्ले देण्यात आली आहे. ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. ह्याची पिक्सेल तीव्रता 294ppi आहे. हा फोन 1.3GHz क्वाड-कोर (MT6580) प्रोसेसरने सुसज्ज आहे. ह्यात 1GB रॅमसुद्धा देण्यात आली आहे. फोनमध्ये 8GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे. ह्या स्टोरेजला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो. हा फोन अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.

हेदेखील वाचा – क्षणार्धात डेटा ट्रान्सफर करणारे हे आहेत काही महत्त्वपुर्ण आणि लोकप्रिय अॅप्स…

ह्या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आहे. हा रियर कॅमेरा LED फ्लॅशसह येतो. फोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. हा एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात 3G, वायफाय, ब्लूटुथ, GPS आणि मायक्रो-USB फीचर्स दिले गेले आहेत. ह्याचा आकार 144.9x71x8.95 mm आणि वजन 157 ग्रॅम आहे.

हेदेखील पाहा – वनप्लस 3 स्मार्टफोन: एक्सक्लुसिव्हली अॅमेझॉन इंडियावर विक्रीसाठी उपलब्ध
हेदेखील वाचा – नुकतेच लाँच झालेल्या शाओमी आणि मिजू स्मार्टफोनमध्ये कोण आहे श्रेष्ठ???

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo