4000mAh क्षमतेची बॅटरी आहे पॅनासोनिकच्या ह्या नवीन स्मार्टफोनमध्ये
हा फोन 3GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले गेले आहे. ह्या स्टोरेजला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो.
पॅनासोनिकने बाजारात आपला नवीन फोन इलुगा A2 लाँच केला आहे. कंपनीने भारतात ह्या स्मार्टफोनची किंमत ९,४९० रुपये ठेवली आहे. हा फोन एक प्रोटेक्टिव स्क्रीन गार्डसह येईल. ह्याची किंमत ३९९ रुपये आहे आणि हे फोनसह मोफत मिळणार आहे.
पॅनासोनिक इलुगा A2 स्मार्टफोनविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5 इंचाची HD IPS डिस्प्ले दिली गेली आहे. फोनमध्ये 1GHz क्वाड-कोर प्रोसेसर दिला आहे. हा फोन 3GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा देण्यात आले आहे ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो. हा फोन अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे.
हेदेखील पाहा – कसा आहे नेक्स्टबिट रॉबिन: पाहा चित्रांच्या माध्यमातून
ह्या स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे, जो LED फ्लॅशसह येतो. फोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा देण्यात आला आहे. फोनमध्ये 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ह्या फोनचा आकार 143.8mm x 72mm x 8.9mm आहे. ह्याचे वजन 167.5 ग्रॅम आहेय हा मॅटेलिक गोल्ड आणि मॅटेलिक सिल्वर रंगात उपलब्ध होईल. हा एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे. ह्यात 4G सपोर्टसुद्धा मिळतो. कनेक्टिव्हिटीसाठी ह्या फोनमध्ये वायफाय, ब्लूटुथ आणि मायक्रो-USB सारखे फीचर्स दिले गेले आहे.
हेदेखील वाचा – फ्लिपकार्टवर मिळत आहे स्मार्टफोन्स, लॅपटॉप्स आणि इतर गॅजेट्सवर भारी सूट
हेदेखील वाचा – लेनोवो वाइब C स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत ६,९९९ रुपये