जबरदस्त डिजाईन, उत्तम फीचर्स आणि फक्त एवढ्याच किंमतीत लॉन्च झाला Panasonic चा हा नवीन एंट्री-लेवल स्मार्टफोन P90

जबरदस्त डिजाईन, उत्तम फीचर्स आणि फक्त एवढ्याच किंमतीत लॉन्च झाला Panasonic चा हा नवीन एंट्री-लेवल स्मार्टफोन P90
HIGHLIGHTS

Panasonic ने आपली नवीन P-सीरीज भारतात लॉन्च केली आहे. या सीरीज अंतर्गत कंपनी ने आपला Panasonic P90 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा डिवाइस कंपनी ने फक्त Rs 5,599 च्या किंमतीत लॉन्च केला आहे.

Panasonic Launched a new entry level smartphone in Indian market at 5,599: Panasonic ने आपली नवीन P-सीरीज भारतात लॉन्च केली आहे. या सीरीज अंतर्गत कंपनी ने आपला Panasonic P90 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा डिवाइस कंपनी ने फक्त Rs 5,599 च्या किंमतीत लॉन्च केला आहे. या डिवाइस मध्ये 1GB रॅम सह MediaTek MT6737 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा डिवाइस कंपनी ने ब्लॅक, ब्लू आणि गोल्ड कलर वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे. या किंमतीत हा डिवाइस Xiaomi आणि अन्य कंपन्यांच्या काही स्मार्टफोंसना चांगली टक्कर देणार आहे. 

याव्यतिरिक्त कंपनी च्या अन्य स्मार्टफोन बद्दल बोलायचे झाले तर काही दिवसांपूर्वी अजून एक स्मार्टफोन पण लॉन्च करण्यात आला होता, ज्याचे नाव Panasonic P95 आहे आणि हा Rs 4,999 च्या किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे. 

हा डिवाइस लॉन्च होताच हा सर्व लीडिंग रिटेल स्टोर्स च्या माध्यमातून उपलब्ध होईल, हा तुम्ही सहज विकत घेऊ शकता. फोन च्या स्पेक्स आणि फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर हा डिवाइस कंपनी ने ड्यूल-सिम क्षमते व्यतिरिक्त एंड्राइड 7.0 नौगट वर लॉन्च केला आहे. स्मार्टफोन मध्ये तुम्हाला एक 5-इंचाचा HD 2.5D कर्व्ड ग्लास डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन मध्ये क्वाड-कोर मीडियाटेक MT6737 प्रोसेसर मिळत आहे. याचा क्लॉक स्पीड 1.25GHz चा आहे, सोबतच फोन मध्ये 1GB चा रॅम पण आहे. 

कॅमेरा आणि अन्य फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर या डिवाइस मध्ये तुम्हाला एक 5-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा ऑटोफोकस आणि एका LED फ्लॅश सह देण्यात आला आहे. तसेच फ्रंट ला पण स्मार्टफोन मध्ये एक 5-मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा पण मिळत आहे. हा कॅमेरा पण LED फ्लॅश सह येतो. 

स्मार्टफोन 16GB च्या इंटरनल स्टोरेज सह लॉन्च झाला आहे, जी तुम्ही माइक्रोएसडी कार्ड च्या मदतीने 128GB पर्यंत वाढवू शकता. फोन मध्ये कनेक्टिविटी ऑप्शन्स मध्ये तुम्हाला 4G LTE, ब्लूटूथ 4.1, GPS, वाई-फाई, USB OTG, आणि FM रेडियो देण्यात आले आहेत. त्याचबरोबर डिवाइस मध्ये तुम्हाला एक 2400mAh क्षमता असलेली बॅटरी पण देण्यात आली आहे. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo