पॅनेसोनिकने लाँच केला आपला नवीन स्मार्टफोन एलुगा टर्बो

पॅनेसोनिकने लाँच केला आपला नवीन स्मार्टफोन एलुगा टर्बो
HIGHLIGHTS

4G कनेक्टिव्हिटीसह पॅनेसोनिकने आपला नवीन स्मार्टफोन एलुगा टर्बो लाँच केला. ह्या स्मार्टफोनमध्ये 3GB ची रॅम देण्यात आली आहे आणि ह्या स्मार्टफोनची किंमत १०,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे.

4G कनेक्टिव्हिटी आणि 3GB रॅमसह पॅनेसोनिकने आपला नवीन स्मार्टफोन एलुगा टर्बो लाँच केला. ह्या स्मार्टफोनची किंमत १०,९९९ रुपये आहे आणि ह्याला आपण स्नॅपडीलच्या माध्यमातून एक्सक्लुसिव्हली घेऊ शकता. ह्या स्मार्टफोनसाठी पॅनेसोनिक एका फ्लॅश सेलचे आयोजन करणार आहे. ह्या सेलसाठी यूजर्स प्री-रजिस्ट्रेशनसुद्धा करु शकता. हा सेल २७ जानेवारीपासून सुरु होईल.

 

स्मार्टफोनमध्ये 5 इंचाची HD IPS डिस्प्ले गोरिल्ला ग्लास 3 ने संरक्षित केली गेली आहे. त्याशिवाय ह्या स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर पॅनेसोनिकने असाही की ड्रॅगनटेल ग्लाससुद्धा दिली आहे, जेणेकरुन ह्याला जराही तोडता येऊ शकणार नाही. फोनमध्ये 64 बिट ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला आहे, त्याचबरोबर आपल्याला ह्यात 3GB रॅमसुद्धा मिळत आहे. फोनमध्ये आपल्याला 32GB चे अंतर्गत स्टोरेज ज्याला आपण 32GB पर्यंत वाढवू शकतो.

त्याशिवाय फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये 13MP चा रियर कॅमेरा LED फ्लॅशसह मिळत आहे , ज्याच्या माध्यमातून आपण FHD व्हिडियो रेकॉर्डिंगसुद्धा करु शकतात. त्याचबरोबर ह्यात आपल्याला 5MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा मिळत आहे. फोनमध्ये 2350mAh क्षमतेची बॅटरीसुद्धा आपल्याला मिळत आहे. हा स्मार्टफोन ड्यूल-सिमला सपोर्ट करतो. हा फोन आपल्याला ब्लू, शॅम्पेन गोल्ड आणि रोझ गोल्ड रंगात उपलब्ध करण्यात आला आहे.

ह्याआधी कंपनीने आपला आकर्षक स्मार्टफोन्स एलुगा L2, I2 आणि T45 फोन्स लाँच केले होते. ज्यांची किंमत क्रमश: ८,२९०, ९९९० आणि ६,९९० रुपये ठरविण्यात आली आहे. हे तीनही स्मार्टफोन्स अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर चालतात.

हेदेखील वाचा – केवळ ४०,९८३ रुपयात अॅप्पल आयफोन 6S होऊ शकतो तुमचा

हा स्लाइडशो पाहा- हे १० अॅप्स तरुण पिढीच्या फोनमध्ये असलेच पाहिजे

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo