Panasonic Eluga Ray 550 स्मार्टफोन 8,999 रुपयांच्या किंमतीत लॉन्च केला गेला आहे आणि 5 एप्रिल पासून हा डिवाइस Flipkart वर सेल साठी उपलब्ध होईल.
Panasonic ने भारतात आपला नवीन स्मार्टफोन Eluga Ray 550 लॉन्च केला आहे ज्याची किंमत 8,999 रूपये आहे. हा स्मार्टफोन 5 एप्रिल पासून ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर उपलब्ध होईल. हा स्मार्टफोन ब्लॉक, ब्लू आणि गोल्ड कलर ऑप्शन्स मध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोन ची एक खासियत ही आहे की या डिवाइस मध्ये AI वर आधारित वर्चुअल असिस्टेंट Arbo आहे जो यूजर चा डेली एक्टिविटी पॅटर्न ट्रॅक करतो. स्मार्टफोन मध्ये स्मार्ट लॉक, ट्रस्टेड वॉईस आणि फिंगरप्रिंट सेंसर सारखे पर्याय पण आहेत. स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाले तर Panasonic Eluga Ray 550 मध्ये 5.7 इंचाचा HD+ डिस्प्ले आहे ज्याचा एस्पेक्ट रेश्यो 18:9 आहे आणि याच्या वर 2.5D कर्व्ड ग्लास आहे. या स्मार्टफोन मध्ये 1.3GHz क्वॉड-कोर मीडियाटेक MT6737 प्रोसेसर आहे. याव्यतिरिक्त या स्मार्टफोन मध्ये 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज आहे आणि याची स्टोरेज माइक्रो SD कार्ड ने 128GB पर्यंत वाढवली जाऊ शकतो. हा स्मार्टफोन एंड्राइड 7.0 नौगट वर चालतो. कॅमेरा डिपार्टमेंट मध्ये Eluga Ray 550 मध्ये 13 मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो LED फ्लॅश सह येतो. सेल्फी साठी डिवाइस मध्ये 8 मेगापिक्सल चा कॅमेरा आहे तोही LED फ्लॅश सह येतो.
हा स्मार्टफोन 3,250mAh बॅटरी सह येतो आणि कनेक्टिविटी साठी Panasonic Eluga Ray 550 डुअल-सिम, 4G, VoLTE, ब्लूटूथ 4.1, Wi-Fi 802.11 b/g/n आणि माइक्रो USB 2.0 पोर्ट ऑफर करतो. याव्यतिरिक्त या स्मार्टफोन मध्ये एसेलरोमीटर, प्रोक्सिमिटी, एम्बिएन्ट लाइट, मॅग्नेटोमीटर आणि फिंगरप्रिंट सेंसर आहे.