मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी पॅनासोनिकने भारतीय बाजारात आपला नवीन फोन एलुगा नोट लाँच केला. भारतीय बाजारात ह्या स्मार्टफोनची किंमत १३,२९० रुपये ठेवण्यात आली आहे.
ह्या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाची पुर्ण HD IPS LTPS आणि FHD डिस्प्ले दिली गेली आहे. ह्याचे डिस्प्ले रिझोल्युशन 1920×1080 पिक्सेल आहे. ह्याची डिस्प्ले पिक्सेल तीव्रता 403ppi आहे. ह्या फोनमध्ये 3GB रॅम आणि 32GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे. हा फोन 1.3GHz ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज आहे.
हेदेखील पाहा – मिजू M3 नोट फर्स्ट लूक
ह्या फोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला गेला आहे. ह्या रियर कॅमे-यासह LED फ्लॅशसुद्धा देण्यात आली आहे. तसेच ह्या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सेचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे.
हेदेखील वाचा – पावसाळ्याच्या दिवसात खूपच फायद्याचे ठरतील हे वॉटरप्रूफ स्मार्टफोन्स
तसेच ह्या फोनमध्ये 4G LTE सपोर्टसुद्धा देण्यात आला आहे. ह्यात 3000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ह्या फोनमध्ये ब्लूटुथ, वायफायसारखे फीचर्ससुद्धा देण्यात आले आहेत. हा शॅम्पेन गोल्ड रंगात उपलब्ध होईल.
हेदेखील वाचा – “फ्रीडम 251” स्मार्टफोनची डिलिवरी लांबणीवर, ६ जुलैपर्यंत करावी लागणार प्रतिक्षा
हेदेखील वाचा – HTC डिझायर 626 ड्यूल सिम स्मार्टफोनची किंमत झाली कमी