पॅनासॉनिक आपला नवीन स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. ह्याची किंमत ११,९९० रुपये ठरविण्यात आली आहे. स्मार्टफोनला आपण ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही माध्यमातून घेऊ शकता.
ह्या स्मार्टफोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे ह्यात फिंगरप्रिंट सेंसर आहे. कंपनीचे असे म्हणणे आहे की, ह्या स्मार्टफोनमध्ये आपण एकाचवेळी ८ वेगवेगळे फिंगरप्रिंट सेव्ह करु शकतो. ह्या किंमतीत लेनोवो K3 नोट ज्याची किंमत ९,९९९ आणि मोटोरोला मोटो G (जेन ३) ज्याची किंमत ११,९९९ रुपये असल्यामुळे ह्या स्मार्टफोन्सशी पॅनासॉनिक एलुगा मार्कला कडक टक्कर द्यावी लागणार आहे.
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉप आहे आणि त्याचबरोबर ह्यात ५.५ इंचाची 720×1280 पिक्सेल रिझोल्युशनची IPS डिस्प्ले मिळत आहे.
स्मार्टफोनमध्ये 1.5GHz ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 615 प्रोसेसरसह 2GB ची रॅम दिली आहे. त्याशिवाय स्मार्टफोनमध्ये 16GB अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला आपण मायक्रो-एसडी कार्डने वाढवू शकतो. फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा LED फ्लॅशसह आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला आहे.
ह्याच्या कनेक्टिव्हिटीबाबत बोलायचे झाले तर, स्मार्टफोनमध्ये 4G सपोर्टशिवाय वायफाय ८०२.११ b/g/n, GPRS/EDGE, 3G, GPS/A-GPS, OTG सपोर्ट, मायक्रो-USB आणि ब्लूटुथ दिला गेला आहे. त्याचबरोबर एम्बियंट लाइट सेंसर, एक्सेलेरोमीटर, ई-कम्पास आणि प्रॉक्सिमिटी सेंसर दिला गेला आहे. स्मार्टफोनमध्ये 2500mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे. आपल्याला हा फोन रॉयल गोल्ड किंवा मॅटेलिक ग्रे रंगात मिळेल.