ह्यात 5.5 इंचाची HD डिस्प्लेसह 1GHz क्वाड-कोर प्रोसेसर, LED फ्लॅशसह 13 मेगापिक्सेलचा रियर आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा, 4G LTE आणि व्हॉईस ओवर LTE (VoLTE) सपोर्टसह पॅनेसोनिक एलुगा i3 स्मार्टफोन बाजारात आणला आहे.
मोबाईल निर्माता कंपनी पॅनेसोनिकने बाजारात एलुगाची नवीन सीरिज एलुगा i3 स्मार्टफोन बाजारात आणला आहे, ज्याची किंमत फक्त ९,२९० रुपये आहे. एलुगा स्मार्टफोनचे ह्याआधीचे व्हर्जन बाजारात खूपच यशस्वी झाले होते.
ह्या स्मार्टफोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे ह्यात 4G LTE सह व्हॉईस ओवर LTE (VoLTE) ला सुद्धा सपोर्ट करतो. कंपनीनुसार, पॅनेसोनिक एलुगा i3 स्मार्टफोन भारतात LTE बँडला सपोर्ट करतो. ज्यात FDD 1800MHz (बँड 3) आणि TDD 2300MHz (बँड 40) आणि ज्यासोबत FDD 850MHz (बँड 5) सुद्धा आहे. केवळ एवढेच नाही तर ह्यात ड्यूल सिमससुद्धा देण्यात आले आहे. ह्यात अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉप व्हर्जन दिले गेले आहे.
ह्या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाची (720×1280 पिक्सेल) HD डिस्प्ले दिली गेली आहे. त्याचबरोबर ह्यात LED फ्लॅशसह १३ मेगापिक्सेलचा रियर आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिग कॅमेरा देण्यात आला आहे. ह्यात 1GHz क्वाड-कोर प्रोसेसर आणि 2GB रॅम देण्यात आली आहे. ज्यात 16GB एक्स्ट्रा स्टोरेज देण्यात आले आहे. एवढेच नाही, तर ह्याला आपण मायक्रो-एसडी कार्डने वाढवू शकतो.
ह्याच्या बॅटरीविषयी बोलायचे झाले तर ह्यात 2700mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी उत्कृष्ट बॅकअप देते. त्याचबरोबर ह्यात ब्लूटुथ आणि 3G कनेक्टिव्हिटीसुद्धा दिली गेली आहे. एलुगा i3 स्मार्टफोन अनेक रंगात बाजारात उपलब्ध केला आहे. ज्यात गोल्ड, रोझ गोल्ड आणि मरीन गोल्ड रंगांचा समावेश आहे.