पॅनेसोनिकने भारतात लाँच केला आपला एलुगा Arc 2 स्मार्टफोन, किंमत१२,९९० रुपये
हा एक डिझाईन फोकस्ड स्मार्टफोन आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 3GB रॅम आणि 32GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे.
पॅनेसोनिकने भारतीय बाजारात आपला नीवन स्मार्टफोन पॅनेसोनिक एलुगा Arc 2 लाँच केला. भारतात ह्याआधीच लाँच झालेल्या एलुगा Arc च्या पीढीचा हा नवीन स्मार्टफोन आहे. पॅनेसोनिक एलुगा Arc 2 स्मार्टफोनची किंमत १२,२९० रुपये ठेवण्यात आली आहे.
ह्या स्मार्टफोनच्या स्पेक्सवर नजर टाकली तर, आपल्याला ह्या स्मार्टफोनमध्ये ह्याचे दोन्ही फ्रंट आणि बॅक पॅनलमध्ये Ashai ड्रॅगनटेल ग्लास दिली आहे. जी ह्या स्मार्टफोनला आणखी आकर्षक आणि प्रीमियम बनवते.
हेदेखील पाहा – Xolo One HD Review – झोलो वन HD रिव्ह्यू
त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाची HD डिस्प्ले दिली गेली आहे. ह्यात आपल्याला 1.3GHz क्वाड-कोर मिडियाटेक MT6735 प्रोसेसरसह 3GB ची रॅमसुद्धा दिली आहे. त्याशिवाय ह्या फोनमध्ये 32GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे, ज्याला आपण माायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड मार्शमॅलोवर चालतो.
हेदेखील वाचा – फिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज आहेत भारतातील हे टॉप ५ बजेट स्मार्टफोन्स…
ह्याच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 8MP चा रियर कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये आपल्याला एक इंटीग्रेटेड IR ब्लास्टरसुद्धा मिळत आहे. त्याशिवाय ह्यात एक 2450mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे.
हेदेखील वाचा – Rcom ने लाँच केला नवीन MoviNet प्लान, किंमत २३५ रुपये प्रति महिना
हेदेखील वाचा – TCL 562 स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत १०,९९० रुपये
Digit NewsDesk
Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile