मोबाईल निर्माता कंपनी ओकीटेलने आपला नवीन स्मार्टफोन K10000 प्रदर्शित केला आहे. हा स्मार्टफोन लवकरच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल. सध्यातरी हा स्मार्टफोन अमेरिकेमध्ये प्री-ऑर्डर बुकिंगसाठी एका ई-कॉमर्स वेबसाइटवर २३९.९९ डॉलर (जवळपास १६,००० रुपये) मध्ये उपलब्ध आहे. कंपनी सध्यातीर ह्या हँडसेटला डिस्काउंटसह १९९.९९ डॉलर(जवळपास१३,५०० रुपये) मध्ये विकत आहे. ऑनलाईन रिटेलरनुसार १०००० स्मार्टफोनची शिपिंग २१ जानेवारीपासून सुरु होईल.
ह्या स्मार्टफोनची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याची बॅटरी. ह्या स्मार्टफोनमध्ये १००००mAh ची बॅटरी दिली गेली आहे, जी बरीच पॉवरफुल आहे. हा स्मार्टफोन डेव्हलप केली जाण्याची माहिती जुलैमध्ये समोर आली होती. त्याचबरोबर ओकीटेलचा हा स्मार्टफोन रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करतो, याचाच अर्थ ह्याचा वापर पॉवर बँक म्हणून केला जाऊ शकतो.
जर ओकीटेल K10000 स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५.५ इंचाची HD IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन 1GHz क्वाड-कोर मिडियाटेक MT6735 चिपसेट आणि 2GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो.
ह्या स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा रियर ऑटोफोकस कॅमेरा आणि २ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. रियर कॅमेरा HDR, फेस डिटेक्शन, फेस ब्युटी, पनोरमा शॉट आणि एंटी शेक सारखे फीचरसह येतो. स्मार्टफोन अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. हा ड्युल सिम ड्युल स्टँडबाय स्मार्टफोन आहे. ह्याचे दोन्ही सिम कार्ड स्लॉट 4G LTEला सपोर्ट करतात. ह्या स्मार्टफोनमध्ये भारतात वापरले गेलेले LTE बँडसाठी सपोर्ट दिला गेला आहे.
कनेक्टिव्हीटीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये GPRS/ एज, GPS/A-GPS, 3G, मायक्रो-USB, ब्लुटूथ आणि वायफाय यांचा समावेश आहे. ह्या स्मार्टफोनचे परिमाण 143x77x9mm आहे आणि ह्याचे वजन १८४ ग्रॅम आहे.