एक लीक झालेला फोटो ह्या स्मार्टफोनचा प्रोटोटाइप दाखवत आहे, ह्यात Nintendo DS मिळणार आहे.
असे सांगितले जात आहे की, ओप्पो स्वत: च्या एक नवीन फोल्डेबल स्मार्टफोनवर काम करत आहे. एका चीनी वेबसाइट Zaeke.com द्वारे लीक झालेला फोटो ह्या स्मार्टफोनचा प्रोटोटाइप दाखवत आहे. ह्या स्मार्टफोनच्या स्पेक्सविषयी अजून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण असे सांगितले जात आहे की, हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड काम करेल. त्याचबरोबर ह्याचा फॉर्म फॅक्टर Nintendo DS सारखे असू शकते. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये एक फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा असेल. रिपोर्टनुसार, ह्या स्मार्टफोनवर कंपनी गेल्या ऑगस्टपासून काम करत आहे आणि ह्याचा एक चालणारा प्रोटोटाइप ह्या फेब्रुवारीपासून तयार आहे.
ह्या महिन्याच्या सुरुवातीला एक अशी बातमी समोर आली होती की, सॅमसंग ह्या वर्षी आपले ५ नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन्स लाँच करणार आहे आणि ह्यातील एक फोल्डेबल डिस्प्ले असलेला स्मार्टफोन असेल. ह्या स्मार्टफोन गॅलेक्सी X असे नाव दिले गेले आहे. तथापि ह्यात एक 4K डिस्प्ले असणार आहे.
तथापि, ह्या दोन्ही कंपन्यांना चीनी कंपनी Moxi ने एक झटका दिला आहे. जो ह्या वर्षी आपला वाकणारा (bendable) डिवाइस विकण्याच्या तयारित आहे. कंपनी चीनमध्ये आपले १,००,००० डिवाइस आणण्याच्या तयारित आहे. आणि ह्यात प्रत्येकाची किंमत जवळपास ५००० रुपयांपासून ५३,००० रुपये असणार आहे. ह्या स्मार्टफोन्समध्ये ई-इंक डिस्प्ले असणार आहे.