Its Here! बहुप्रतीक्षित Oppo Reno11 Series भारतात लाँच, स्मार्टफोनची प्री-ऑर्डर देखील सुरु। Tech News
Oppo Reno11 Series 5G अखेर आज भारतात लाँच करण्यात आली आहे.
फोनची प्री-ऑर्डर देखील आजपासून म्हणजेच 12 जानेवारी 2024 पासून सुरू
यावर 3000 रुपयांपर्यंतची झटपट सूट आणि 3000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर
मागील काही काळापासून प्रतीक्षेत असलेली Oppo Reno11 Series 5G आज भारतात लाँच करण्यात आली आहे. या सिरीजमध्ये दोन स्मार्टफोन आणण्यात आले आहेत. यामध्ये Oppo Reno11 आणि Oppo Reno11 Pro 5G चा समावेश आहे. एवढेच नाही तर, फोनची प्री-ऑर्डर देखील आजपासून म्हणजेच 12 जानेवारी 2024 पासून सुरू झाली आहे. चला तर मग जाणून घेऊयात या स्मार्टफोन्सची किंमत, फीचर्स आणि स्पेसीफिकेशन्स-
हे सुद्धा वाचा: Samsung Smartphones Price Cut: एकत्र स्वस्त झाले कंपनीचे Popular स्मार्टफोन, किमतीत प्रचंड मोठी कपात। Tech News
Oppo Reno11 5G सिरीजची भारतात किंमत
Oppo Reno11 5G च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजच्या व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये आहे. तर, 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेले वेरिएंट 31,999 रुपयांमध्ये आणले गेले आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यावर 3000 रुपयांपर्यंतची झटपट सूट आणि 3000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर आहे. हा फोन वेव्ह ग्रीन आणि रॉक ग्रे कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.
याव्यतिरिक्त, Oppo Reno11 Pro 5G एकाच 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे, ज्याची किंमत 39,999 रुपये आहे. यावर एक्सचेंज बोनस आणि 4000 रुपयांपर्यंत झटपट सूट आहे. हा फोन पर्ल व्हाइट आणि रॉक ग्रे या कलर ऑप्शन्ससह येतो. Oppo Reno11 Series 5G ची किंमत बँक ऑफरसह 26,999 रुपयांपासून सुरू होते.
Oppo Reno11 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Oppo Reno11 5G मध्ये 6.7 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 7050 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, हे 256GB पर्यंत स्टोरेज आणि 8GB पर्यंत रॅमसह प्रदान केले आहे.
याशिवाय, फोटोग्राफीसाठी, फोनच्या बेस बाजूला 50MP मुख्य कॅमेरा आणि 32MP टेलिफोटो लेन्स उपलब्ध आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी समोर 32MP कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 67W SuperVOOC फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट करते. हे 47 मिनिटांत 100% चार्ज होईल.
Oppo Reno11 Pro 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Oppo Reno11 Pro 5G फोन MediaTek Dimensity 8200 प्रोसेसरसह येतो. यामध्ये 12GB रॅम उपलब्ध आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 4600mAh बॅटरी आहे, जी 80W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनचे इतर सर्व स्पेसिफिकेशन्स बेस व्हेरिएंटप्रमाणेच आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile