Oppo Reno11 Series ची लाँच डेट जाहीर, Reno11 Pro आणि Enco Buds2 मिळतील Free? 

Oppo Reno11 Series ची लाँच डेट जाहीर, Reno11 Pro आणि Enco Buds2 मिळतील Free? 
HIGHLIGHTS

Oppo Reno11 Series 5G भारतात लाँच होण्यासाठी सज्ज

लकी ड्रॉद्वारे Oppo reno 11 Pro 5G आणि Enco Buds2 मोफत मिळवण्याची संधी

अधिकृत वेबसाइटनुसार, Oppo reno 11 मध्ये 32MP टेलिफोटो पोर्ट्रेट कॅमेरा मिळेल.

मागील काही काळापासून Oppo Reno11 Series 5G ची भारतीय बाजारपेठेत आतुरतेने वाट पाहिली जात आहे. लक्षात घ्या की, चीनमध्ये Reno सीरिज आधीच लाँच झाली आहे. आता ही सिरीज भारतात लाँच होण्यास सज्ज झाली आहे. Oppo इंडियाच्या अधिकृत वेबसाइट आणि Flipkart वर या सिरीजचे एक पेज लाइव्ह देखील करण्यात आले आहे.

oppo reno 11

आम्ही तुम्हाला सांगतो की, Oppo Reno11 आणि Oppo Reno11 Pro हे दोन हँडसेट सीरिज अंतर्गत आणले जातील, असे अधिकृत वेबसाईटवरून समोर आले आहे. विशेष म्हणजे लाँचपूर्वी कंपनी लोकांना लकी ड्रॉद्वारे Oppo reno 11 Pro 5G आणि Enco Buds2 मोफत मिळवण्याची संधी देत ​​आहे. चला तर मग बघुयात सविस्तर माहिती.

Oppo Reno11 सीरीजचे भारतीय लाँच

Oppo Reno11 Series 5G भारतात 11 जानेवारी 2024 रोजी लाँच होऊ शकते. तथापि, कंपनीने अद्याप अधिकृत लाँच डेट जाहीर केलेली नाही. सीरीजच्या मायक्रो वेबसाईटवरून फोनचे खास स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. अधिकृत वेबसाइटनुसार, Oppo reno 11 मध्ये 32MP टेलिफोटो पोर्ट्रेट कॅमेरा मिळेल. तर, फोनमध्ये 67W SuperVOOC फ्लॅश चार्जिंग सपोर्ट असलेली बॅटरी असेल. तसेच, Pro व्हेरिएंट 80W SuperVOOC फ्लॅश चार्जिंग सपोर्टसह येईल. येत्या काही दिवसांत कंपनी फोनची अधिकृत लाँच डेट जाहीर करेल.

Oppo Reno11 series charging features officially revealed
Credit: Gizmochina

Oppo लकी ड्रॉमध्ये मोफत मिळेल फोन आणि इयरबड्स

1 जानेवारी ते 12 जानेवारी 2024 पर्यंत लकी ड्रॉमध्ये कोणीही सहभागी होऊ शकतो. लकी ड्रॉसाठी तुम्हाला दोन संधी मिळतील. यामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला Oppo India च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर, तुम्हाला मुख्यपृष्ठ म्हणजेच होम पेजवरील सीरिजच्या पेजवर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर, आता स्क्रॉल डाऊन करून खाली जा. तेथे तुम्हाला Win OPPO Reno11 Pro 5G आणि Enco Buds2 Free सेक्शन दिसेल. त्यात दिलेल्या Draw Now बटणावर क्लिक करा. आता तुम्हाला तुमच्या Gmail ID ने साइन अप करावे लागेल. त्यानंतर स्क्रीनवरील सूचनांचे अनुसरण करा आणि लकी ड्रॉसाठी साइन अप करा. जर तुमचे लक तुमच्यासोबत असेल तर, Oppo आपोआप बक्षीस तुमच्या खात्यावर पाठवेल.

एवढेच नाही तर, OPPO Reno11 Pro 5G आणि OPPO Enco Buds2 सोबत तुम्हाला लकी ड्रॉमध्ये 50,000 पॉइंट्स, 30,000 पॉइंट्स, 5,000 पॉइंट्स किंवा 200 रुपयांची कूपन सूट देखील मिळण्याची शक्यता आहे. लक्षात घ्या की, तुम्ही 1,999 रुपयांच्या खरेदीवर कूपन सवलत वापरू शकता.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo