Bluetooth SIG सर्टिफिकेशन मधून समोर आले आहे कि CPH1919 फोन Oppo Reno म्हणून लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच या सर्टिफिकेशन मधून असे पण समोर येत आहे कि CPH1917 आणि CPH1921 पण कन्फर्म झाले आहेत. हा मोबाईल फोन स्नॅपड्रॅगॉन 710 आणि 5G वर्जन मध्ये येणार आहे. CPH1919 बद्दल बोलायचे झाले तर हा मास्टर लू बेंचमार्किंग प्लॅटफॉर्म वर दिसला आहे, तसेच यात फोनला इम्प्रेसिव स्कोर पण मिळाले आहेत. तसेच इथे याचे काही मुख्य स्पेक्स पण समोर आले आहेत.
बेंचमार्क लिस्टिंग मध्ये आपल्याला असे दिसले आहे कि Oppo Reno मोबाईल फोन मध्ये एक FHD+ 2340×1080 पिक्सल रेजोल्यूशन वाला डिस्प्ले मिळत आहे. तसेच यात तुम्हाला स्नॅपड्रॅगॉन 855 मोबाईल प्लॅटफॉर्म मिळणार आहे. अलीकडेच आलेला एक रिपोर्ट पाहता या लिस्टिंग मध्ये CPH1919 मॉडेल मध्ये तुम्हाला एक 6.65-इंचाचा डिस्प्ले मिळत आहे. त्याचबरोबर असे पण समोर येत आहे कि या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक नॉच-लेस डिस्प्ले मिळत आहे. सोबत मोबाईल फोन मध्ये एक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर पण मिळणार आहे. फोन मध्ये एक लिक्विड कुलिंग पण असेल, जी डिवाइसचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करेल.
असे पण समोर येत आहे कि मोबाईल फोन मध्ये तुम्हाला 8GB रॅम मिळणार आहे, तसेच यात तुम्हाला इन्टरनल स्टोरेज म्हणून 256GB स्टोरेज पण मिळत आहे. या बेंचमार्किंग साइट वरील स्कोर बद्दल बोलायचे तर याला 389,386 स्कोर मिळाला आहे. असे पण समोर येत आहे कि कंपनी याचा एक 5G रेडी वेरिएंट पण आणणार आहे.
कॅमेरा इत्यादी पाहताच समजते कि फोन मध्ये तुम्हाला एक ट्रायंगल शेप वाला पॉप-अप सेल्फी कॅमेरा मिळणार आहे, सोबत एक 16MP ची लेंस असेल आहे, जी LED फ्लॅश सह येईल. तसेच फोन मध्ये तुम्हाला एक ट्रिपल कॅमेरा सेटअप पण मिळू शकतो. विशेष म्हणजे फोन मध्ये Sony IMX586 चा 48MP+8MP+13MP चा कॅमेरा मोड्यूल मिळणार आहे. हा कॅमेरा 10X हाइब्रिड झूम सह येणार आहे. फोन मध्ये तुम्हाला VOOC 3.0 फ्लॅश चार्जिंग सपोर्ट सह एक 4,065mAh क्षमता असलेली बॅटरी मिळणार आहे.
हा मोबाईल फोन म्हणजे Oppo Reno चीन मध्ये वेगवेगळ्या चार रंगांच्या ऑप्शन्स मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. हा मोबाईल फोन तुम्ही मिडनाइट ब्लॅक, सी ग्रीन, नेब्युला पर्पल आणि पिंक रंगात घेऊ शकता. पण या मोबाईल फोनच्या किंमतीबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही.