Oppo आपली लोकप्रिय Reno 8 सिरीज एका नवीन स्मार्टफोन, Oppo Reno 8T सह विस्तारीत करत आहे. हा फोन लवकरच बाजारात लाँच होणार आहे. आत्तापर्यंत या स्मार्टफोनशी संबंधित अनेक लीक आणि अफवा समोर आल्या आहेत. अलीकडेच, एका टिपस्टरने Oppo Reno 8T संदर्भात एक लीक जारी केली आहे, ज्यामध्ये त्याची फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स उघड झाली आहेत. या स्मार्टफोनमध्ये 6.43-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे, ज्यामध्ये फुल HD + रिझोल्यूशन, 90Hz रिफ्रेश रेट आहे. यासोबतच अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आला आहे.
हे सुद्धा वाचा : 3 महिन्यांसाठी Jio प्लॅन, 5G डेटासह मिळेल टीव्ही शो, चित्रपट आणि बरेच बेनिफिट्स…
Tipster SnoopyTech ने या आठवड्याच्या सुरुवातीला Oppo स्मार्टफोनच्या प्रमुख फीचर्सची एक शीट शेअर केली आहे. Oppo Reno 8T ला 100-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 2-मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा ब्लॅक-अँड-व्हाइट मोनो लेन्ससह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल. व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील असेल.
Reno 8T मध्ये FHD+ रिझोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटसह 6.43-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे. या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट रीडर उपलब्ध असेल. यात व्हिज्युअल प्रोटेक्शन फीचरही असेल. बॅटरीसाठी, सुपरवूक 33W चार्जिंग सपोर्टसह 5,000 mAh बॅटरी उपलब्ध असेल. तसेच, यात IPX54 रेटिंग उपलब्ध असेल. Oppo Reno 8T Android 13 वर आधारित ColorOS 13 वर काम करेल.
काही दिवसांपूर्वी टिपस्टर मुकुल शर्माने देखील Oppo Reno 8T ची किंमत आणि लाँच डेट उघड केली होती. आगामी स्मार्टफोन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. टिपस्टरनुसार, स्मार्टफोनची अपेक्षित किंमत सुमारे 32,000 रुपये असण्याची शक्यता आहे. याशिवाय, यात 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज क्षमता असण्याची शक्यता आहे. हा फोन Snapdragon 695 SoC वर काम करू शकतो.