Oppo च्या लेटेस्ट 5G फोनवर मिळतोय बंपर डिस्काउंट, येथे बघा अप्रतिम ऑफर

Updated on 07-Jun-2023
HIGHLIGHTS

Oppo Reno 8T 5G वर सध्या ऑफर्सचा वर्षाव सुरु आहे.

ICICI बँक क्रेडिट कार्डसह पेमेंट व्यवहार केल्यास 10% सूट

HDFC बँक डेबिट कार्ड व्यवहारावर 1,250 रुपयांची सूट

Oppo ने तुमच्यासाठी बाजारात स्मार्टफोनचे सर्वोत्तम पर्याय सादर केले आहेत. या स्मार्टफोन्समध्ये तुम्हाला कमी किमतीत खूप चांगले फीचर्स मिळतात. Oppo Reno 8T 5G वर सध्या ऑफर्सचा वर्षाव सुरु आहे. खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला ऑफर्सची संपूर्ण माहिती जाणून घ्यायला हवी. 

Oppo Reno 8T 5G

तुम्ही Flipkart वरून OPPO Reno 8T 5G चा 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट कमी किमतीत खरेदी करू शकता. या फोनची MRP 38,999 रुपये आहे आणि तुम्हाला यासह 23% डिस्काउंट मिळणार आहे. या डिस्काउंटसह 29,999 रुपयांमध्ये फोन खरेदीसाठी सूचिबद्ध आहे. 

ऑफर्स :

 यावर अनेक बँक ऑफर्सही मिळत आहेत. ICICI बँक क्रेडिट कार्डसह पेमेंट व्यवहार केल्यावर तुम्हाला 10% सूट मिळणार आहे. HDFC बँक डेबिट कार्ड व्यवहारावर 1,250 रुपयांची सूट मिळणार आहे. फोनवर एक्सचेंज ऑफर सुद्धा उपलब्ध आहे. जुन्या फोन ऐवजी तुम्हाला तब्बल 27,550 रुपयांची सूट मिळेल. लक्षात घ्या की, जुन्या फोनची स्थिती उत्तम असायला हवी. येथून खरेदी करा 

Oppo Reno 8T 5G चे मुख्य तपशील

या फोनमध्ये तुम्हाला 6.7 इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले मिळणार आहे. यात तुम्हाला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 108MP आणि 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 4800mAh लिथियम-आयन पॉलिमर बॅटरी उपलब्ध आहे. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर म्हणून मिळेल. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :