Oppo Reno 8 सीरीज लवकरच भारतात लाँच होणार, टॅबलेट देखील येईल भारतात

Oppo Reno 8 सीरीज लवकरच भारतात लाँच होणार, टॅबलेट देखील येईल भारतात
HIGHLIGHTS

Oppo Reno 8 आणि Oppo Reno 8 Pro लवकरच भारतात लाँच होणार.

Oppo Reno 8 सीरीज भारतात जुलैच्या सुरूवातीस किंवा जूनच्या अखेरीस सादर केले जातील.

दोन्ही फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे.

Oppoने नुकतीच Oppo Reno 8 सीरीज देशांतर्गत बाजारात लाँच केली आहे. Oppo Reno 8 सीरीज लवकरच भारतात लाँच होणार असल्याची माहिती समोर आली आहे. Oppo Reno 8 सीरीजसोबत Oppo Pad Air देखील भारतात लाँच होणार असल्याची बातमी आहे. या सीरीज अंतर्गत, दोन फोन Oppo Reno 8 आणि Reno 8 Pro चीनमध्ये लाँच केले गेले आहेत. ज्यामध्ये Snapdragon 7 Gen 1 आणि MediaTek Dimensity 8100-Max प्रोसेसर दिले गेले आहेत. दोन्ही फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देखील देण्यात आला आहे. त्याबरोबरच, Oppo Pad Air मध्ये Snapdragon 680 प्रोसेसर देण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, Oppo Reno 8 आणि Oppo Reno 8 Pro ची भारतात चाचणी केली जात आहे. यासोबतच Oppo Pad Airची चाचणीदेखील सुरू आहे. या दोन्ही फोनसह टॅब जुलैच्या सुरूवातीस नाही तर जूनच्या अखेरीस सादर केले जातील, अशी माहिती मिळाली आहे. रिपोर्टनुसार, Oppo Reno 8 भारतात Oppo Reno 8 Pro च्या फीचर्ससह सादर केला जाईल, तर Oppo Reno 8 Pro हा Oppo Reno 8 Pro+ च्या फीचर्ससह लाँच केला जाणार आहे.

Oppo Reno 8 चे स्पेसिफिकेशन्स

Oppo Reno 8 मध्ये Android 12 सह ColorOS 12.1 आहे. याशिवाय, यात 90Hz च्या रीफ्रेश रेटसह 6.43-इंच लांबीचा फुल एचडी + AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेवर गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 1300 प्रोसेसरसह 12 GB पर्यंत LPDDR4x रॅम आणि 256 GB पर्यंत स्टोरेज आहे.

Oppo Reno 8 मध्ये तीन रियर कॅमेरे आहेत ज्यात प्रायमरी लेन्स 50 मेगापिक्सेल आहे. दुसरी लेन्स 2 मेगापिक्सेल ब्लॅक अँड व्हाईट आणि तिसरी लेन्स 2 मेगापिक्सेल मॅक्रो आहे. आकर्षक सेल्फीसाठी फोनमध्ये 32-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय, कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth v5.3, GPS/A-GPS, NFC आणि USB Type-C पोर्ट आहे. तसेच, फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. Oppo Reno 8 मध्ये 4500mAhची बॅटरी आहे. 

Oppo Reno 8 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Oppo Reno 8 मध्ये Android 12 सह ColorOS 12.1 आहे. याशिवाय, यात 120Hz च्या रीफ्रेश रेटसह 6.62-इंच लांबीचा फुल HD + AMOLED E4 डिस्प्ले आहे. डिस्प्लेवर गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन प्रोसेसर 7 Gen 1 असून 12 GB पर्यंत LPDDR4x रॅम आणि 256 GB पर्यंत स्टोरेज आहे.

Oppo Reno 8 Pro मध्ये तीन रियर कॅमेरे देखील आहेत, ज्यात प्रायमरी लेन्स 50 मेगापिक्सेल आहे. दुसरी लेन्स 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड अँगलची आहे आणि तिसरी लेन्स 2 मेगापिक्सेल मॅक्रो आहे. आकर्षक सेल्फीसाठी फोनमध्ये 32-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.  सर्वोत्तम कॅमेरा अनुभवासाठी, Mariana MariSilicon X चिप देण्यात आली आहे. याशिवाय, कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth v5.3, GPS/A-GPS, NFC आणि USB Type-C पोर्ट आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. या फोनमध्ये 4500mAhची बॅटरी आहे.

Oppo Pad Air चे स्पेसिफिकेशन्स

Oppo Pad Air मध्ये Android 12 सह ColorOS आहे. यात 60Hz च्या रिफ्रेश रेटसह 10.36-इंच लांबीचा डिस्प्ले आहे. डिस्प्लेची ब्राइटनेस 360 आहे. यामध्ये, स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसरसह ग्राफिक्ससाठी Adreno 610 GPU, 6GB LPDDR4x रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज आहे.

Oppo Pad Air मध्ये 8 मेगापिक्सेल रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. टॅबमध्ये Wi-Fi 5, Bluetooth v5.1 आणि USB Type-C पोर्ट आहे. Oppo Pad Air मध्ये 7100mAhची बॅटरी आहे. टॅबमध्ये चार स्पीकर आहेत, ज्यासोबत Dolby Atmosचा सपोर्ट आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo